ETV Bharat / bharat

Assam Flood : आसाममध्ये पूरस्थिती गंभीर; लाखो लोकांना पुराचा फटका - आसाममध्ये जोरदार पाऊस

आसाममध्ये संततधार पावसामुळे 16 जिल्ह्यांतील सुमारे 4.89 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. ASDMA च्या पुराच्या अहवालानुसार, एकट्या बजाली जिल्ह्यात सुमारे 2.67 लाख लोक प्रभावित झाले आहेत. जिल्हा प्रशासनाने पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये 140 मदत शिबिरे आणि 75 मदत वितरण केंद्रे स्थापन केली आहेत. ASDMA पूर अहवालात असेही नमूद केले आहे की 4,27,474 पाळीव जनावरांनाही पुराचा फटका बसला आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Jun 24, 2023, 2:00 PM IST

आसाममध्ये पूरस्थिती गंभीर

गुवाहाटी : आसाममधील पूरस्थिती अजूनही गंभीर आहे. 16 जिल्ह्यांतील सुमारे 4.89 लाख लोकांना याचा फटका बसला आहे. नलबारी जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पुराच्या पाण्यात एकाचा बुडून मृत्यू झाल्याने मृतांची संख्या दोन झाली आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (ASDMA) पुराच्या अहवालानुसार, एकट्या बजाली जिल्ह्यात सुमारे 2.67 लाख लोक प्रभावित झाले आहेत. यानंतर नलबारीमध्ये 80 हजार 061, बारपेटामध्ये 73 हजार 233, लखीमपूरमध्ये 22 हजार 577, दारंगमध्ये 14 हजार 583, तामुलपूरमध्ये 14 हजार 180, बक्सामध्ये 7 हजार 282 आणि गोलपारा जिल्ह्यात 4 हजार 750 लोक बाधित झाले आहेत. 10 हजार 782.80 हेक्टर पीक जमीन पुराच्या पाण्याने पाण्याखाली गेली आहे.

लाखो नागरिक प्रभावित - बजाली, बक्सा, गोलपारा, गोलाघाट, कामरूप, बोनगाईगाव, चिरांग, दररंग, धेमाजी, धुबरी, कोक्राझार, लखीमपूर, नागाव, नलबारी, तामुलपूर, बारपेटा, बिस्वगरुनाथ, दिवगरुनाथ, उ.दलगुळ जिल्हा या 54 महसूल विभागांतर्गत 1,538 गावे महापुराने प्रभावित झाली आहेत. मुसळधार पावसामुळे ब्रह्मपुत्रा नदीची जलपातळी जोरहाट जिल्ह्यातील नेमटीघाट आणि धुबरी येथे धोक्याच्या पातळीच्या वर गेली आहे. NH रोड क्रॉसिंगवर मानस नदी, NT रोड क्रॉसिंगवर पगलाडिया नदी, NH रोड क्रॉसिंगवर पुथिमारी नदीची पाणी पातळी धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहे.

मदत केंद्र स्थापन - प्रशासनाने पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये 140 मदत शिबिरे आणि 75 मदत वितरण केंद्रे स्थापन केली आहेत. या मदत छावण्यांमध्ये 35 हजार 142 लोकांनी आश्रय घेतला आहे. दुसरीकडे, इतर अनेकांनी रस्ते, उंच भाग आणि बंधाऱ्यांवर आश्रय घेतला आहे. ASDMA पूर अहवालात असेही नमूद केले आहे की, 4,27,474 पाळीव जनावरांनाही पुराचा फटका बसला आहे.

पूरस्थिती गंभीर -गेल्या 24 तासात पुराच्या पाण्याने 1 बंधारा फुटला आहे, तर 14 इतर बंधारे बाधित झाले आहेत. यासह 213 रस्ते, 14 पूल, अनेक कृषी बंधारे, शाळा इमारती, सिंचन कालवे, कल्व्हर्ट यांचे पुरामुळे नुकसान झाले आहे. दरम्यान, बजाली जिल्ह्यातील पूरस्थिती अजूनही गंभीर आहे. 191 गावांतील 2,67,253 लोक बाधित झाले आहेत. ASDMA नुसार, जिल्ह्यातील बाजली महसूल मंडळात 1,76,678 आणि सरुपेटा महसूल मंडळात 90,575 लोक बाधित झाले आहेत. जिल्ह्यातील ३६८.३० हेक्टर पीकही पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे.

हेही वाचा -

  1. Monsoon in Maharashtra : आनंदाची बातमी! महाराष्ट्रात मान्सून सक्रिय; मुंबईसाठी यलो अलर्ट
  2. Assam Flood : आसाममध्ये पूरस्थिती गंभीर झाल्याने जनजीवन विस्कळीत, लाखो नागरिकांना पुराचा फटका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.