नवी दिल्ली - सोमवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या ( Monsoon Session 2022 ) दुसऱ्या आठवड्याचा पहिला दिवस आहे. नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी सोहळ्यामुळे दुपारी २ वाजता संसदेचे कामकाज ( Lok Sabha Proceedings ) सुरू होईल. गेल्या आठवड्यात महागाईच्या मुद्यावरून विरोधकांनी संसदेचे कामकाज होऊ दिले नव्हते. या आठवड्यातही तशीच शक्यता व्यक्त केली जात आहे. महागाई आणि नवीन जीएसटी दरांबाबत आठवड्याच्या पहिल्या दिवशी विरोधक दोन्ही सभागृहात आक्रमक होण्याची शक्यता आहे. या मुद्द्यावरील गतिरोध अजूनही कायम आहे.
स्मृती इराणींचा मुद्दाही गाजणार - याशिवाय काँग्रेस स्मृती इराणी यांच्याशी संबंधित मुद्दा संसदेत उपस्थित करू शकते. हे प्रकरण संसदेत मांडणार असल्याचे काँग्रेसने शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले होते. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी रविवारी काँग्रेस नेते जयराम रमेश आणि पवन खेरा यांना कायदेशीर नोटीस पाठवून त्यांच्या आणि त्यांच्या मुलीवर लावण्यात आलेल्या निराधार आणि खोट्या आरोपांबद्दल माफी मागण्यास सांगितले. काँग्रेस नेत्यांनी आरोप केल्यानंतर इराणी यांनी हे पाऊल उचलले आहे.
हेही वाचा - Rajnath Singh On PoK : पाकव्याप्त काश्मीर भारताचाच, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची स्पष्टोक्ती