ETV Bharat / bharat

IND vs SA T20 Series : दुखापतग्रस्त बुमराहच्या जागी मोहम्मद सिराज भारतीय संघात दाखल

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या टी-20 मालिकेसाठी ( IND vs SA T20 Series ) बीसीसीआयने मोहम्मद सिराजचा संघात समावेश केला आहे. दुखापतग्रस्त बुमराहच्या जागी त्याला संधी देण्यात आली आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Sep 30, 2022, 12:25 PM IST

नवी दिल्ली: भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात तीन सामन्यांची टी-20 मालिका ( IND vs SA T20 Series ) खेळली जात आहे. या मालिकेला सुरुवात होताच, भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे ( Jasprit Bumrah injured ) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उर्वरित दोन टी-20 सामन्यांतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी या उर्वरित सामन्यांसाठी मोहम्मद सिराजला ( Mohammed Siraj replaces injured Jasprit Bumrah ) संधी देण्यात आली आहे. याबाबत बीसीसीआयने सोशल मीडियाच्या माध्यमातून सिराजचा संघात समावेश केल्याची माहिती दिली.

युवा गोलंदाज सिराजने अनेक प्रसंगी भारतासाठी चमकदार कामगिरी केली आहे. 2022 च्या टी-20 विश्वचषकासाठीही त्याला संधी मिळू शकते. अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहच्या जागी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उर्वरित टी-20 मालिकेसाठी मोहम्मद सिराजचा भारतीय संघात समावेश केला आहे, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( BCCI ) सचिव जय शाह ( BCCI Secretary Jai Shah ) यांनी सांगितले. शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनात ते म्हणाले, बुमराह पाठीच्या दुखापतीने त्रस्त असून सध्या तो बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे.

  • Mohd. Siraj replaces injured Jasprit Bumrah for the remainder of the T20I series against South Africa: BCCI

    Bumrah has sustained a back injury and is currently under the supervision of the BCCI Medical Team. pic.twitter.com/fDhVv6uBos

    — ANI (@ANI) September 30, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

28 वर्षीय उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने ( Fast bowler Mohammad Siraj ) आतापर्यंत पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ज्यात त्याने पाच विकेट घेतल्या आहेत. त्याने या वर्षी फेब्रुवारीमध्ये धर्मशाला येथे श्रीलंकेविरुद्ध शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या 1-0 ने आघाडीवर आहे. बुधवारी तिरुअनंतपुरममध्ये झालेला पहिला सामना त्यांनी आठ विकेट्सने जिंकला. दुसरा सामना 2 ऑक्टोबरला गुवाहाटीमध्ये तर तिसरा सामना 4 ऑक्टोबरला इंदूरमध्ये खेळवला जाईल.

मोहम्मद सिराजने टी-20 फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. इंडियन प्रीमियर लीगमधून तो चमकला. यानंतर, 2017 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळून त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण ( Mohammad Siraj T20I debut ) केले. सिराजने आतापर्यंत 5 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 5 विकेट्स घेतल्या आहेत. सिराजने फेब्रुवारी 2022 मध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटचा टी-20 सामना खेळला होता.

सिराजला टी-20 विश्वचषक 2022 ( T20 World Cup 2022 ) साठी देखील संधी देऊ शकतो. बुमराहच्या अनुपस्थितीत त्याला टीम इंडियात सामील होण्याची चांगली संधी आहे. मात्र यासाठी सिराजला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उर्वरित दोन टी-20 सामन्यांमध्ये स्वत:ला सिद्ध करावे लागेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताकडून अर्शदीप सिंग आणि दीपक चहर यांनी चांगली गोलंदाजी केली.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ -

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, दीपक चहर, उमेश यादव, श्रेयस अय्यर, शाहबाज अहमद, मोहम्मद सिराज.

हेही वाचा - Irani Cup : शेष भारत संघाच्या कर्णधारपदी हनुमा विहारीची वर्णी, पाहा संपूर्ण संघ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.