ETV Bharat / bharat

IPL 2022: विराटचे आयपीएल कारकिर्दीतील 43 वे अर्धशतक पूर्ण! मोहम्मद शमीकडून अभिनंदन - विराट कोहलीची IPL मधील बॅटींग

आयपीएलच्या या मोसमात गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीची बॅट पहिल्यांदा खेळली. विराट ५३ चेंडूत ५८ धावा करून बाद झाला. (Mohammad Shami congratulates Virat Kohli) त्याने आयपीएल कारकिर्दीतील 43 वे अर्धशतक पूर्ण केले. विराटने आपल्या डावात अनेक शानदार फटके मारले. मात्र, या सामन्यात आरसीबीला गुजरात टायटन्सकडून सहा गडी राखून पराभव पत्करावा लागला.

विराटचे आयपीएल कारकिर्दीतील 43 वे अर्धशतक पूर्ण

author img

By

Published : May 1, 2022, 12:22 PM IST

मुंबई - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB)चा माजी कर्णधार विराट कोहलीने शनिवारी गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात आयपीएलच्या या मोसमातील पहिले अर्धशतक झळकावले. कोहली 53 चेंडूत 58 धावा करून बाद झाला. (Virat Kohli First Half Century in IPL) तो मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर बाद झाला. तत्पूर्वी, जेव्हा मोहम्मद शमी आरसीबीच्या डावातील 13 वे षटक टाकण्यासाठी आला तेव्हा विराट क्रीजवर होता.

शमीच्या चेंडूवर एक धाव घेत विराटने आपले अर्धशतक पूर्ण केले. प्रदीर्घ कालावधीनंतर फॉर्ममध्ये परतलेला कोहली आपले अर्धशतक पूर्ण केल्यानंतर निश्चिंत दिसला. त्याचवेळी, विरोधी संघ असूनही, मोहम्मद शमीने विराटचे अर्धशतक पूर्ण केल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि माजी भारतीय कर्णधाराच्या पाठीवर हात ठेवून त्याचे अभिनंदन केले. शमीच्या या खेळाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. शमीच्या या हावभावाचे चाहते कौतुक करत आहेत.

IPL 2022 मध्ये विराट कोहली पहिल्यांदा फलंदाजी करत आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या या खेळीत त्याने अनेक शानदार फटके मारले. विराटने 13व्या षटकात 45 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. कोहलीचे आयपीएल कारकिर्दीतील हे ४३ वे अर्धशतक आहे. मात्र, या सामन्यात आरसीबीला गुजरात टायटन्सकडून सहा गडी राखून पराभव पत्करावा लागला.

हेही वाचा - इंधनाचा भडका! मे महिन्याच्या पहिल्याच तारखेला 'LPG'च्या दरात 102.50 पैशांची झाली वाढ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.