ETV Bharat / bharat

Karnataka polls 2023 : दक्षिणेकडील निवडणुकावर भाजपचे लक्ष , मोदी कर्नाटक आणि तर शाह तेलंगणाच्या दौऱ्यावर!

कर्नाटक आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांमध्ये यंदा विधानसभा निवडणुका होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज दक्षिण भारतातील दोन राज्यांमध्ये पूर्वनियोजन दौरे करत आहेत.

Karnataka polls 2023
मोदी-शाह
author img

By

Published : Mar 12, 2023, 12:22 PM IST

हैदराबाद (तेलंगणा) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोघेही आज दक्षिण भारतातील कर्नाटक आणि तेलंगणा राज्यांमध्ये पूर्वनियोजन दौरे करत आहेत. कर्नाटकात येत्या 2 महिन्यात मेमध्ये महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. तेलंगणामध्ये या वर्षी डिसेंबरमध्ये निवडणुका होणार आहेत. दोन्ही राज्यातील भारतीय जनता पक्ष (भाजप) नेते आणि कार्यकर्ते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या नेत्यांच्या भेटीमुळे उत्साहित आहेत.

भाजपची चांगली कामगिरी : अलीकडेच त्रिपूरा, नागालॅँड, मिझोरम आणि गुजरातमध्ये निवडणूका पार पडल्या. या निवडणूकांमध्ये भाजपने चांगली कामगिरी केल्याचे दिसले. आता मोदी-शाह यांचे लक्ष्य दक्षिणेकडे आहे, असे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. कर्नाटक आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांमध्ये यंदाच्या निवडणुकीत भाजपची खडतर कसोटी लागणार आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनंतर, दोन दक्षिणेकडील राज्यांमध्ये भाजपला सत्तेपासून दूर करण्यासाठी मोठ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवीन उत्साह संचारला आहे. विरोधकांची तगडी फळी निर्माण करण्यासाठई सर्व विरोधक एकवटत आहेत. यात शरद पवार, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, यांचा देखील समावेश आहे.

करो किंवा मरो अशी : काँग्रेससाठी यंदाच्या विधानसभा निवडणुका करो किंवा मरो अशी आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने आंध्र प्रदेशात काँग्रेसला आधीच धूळ चारली आहे. तामिळनाडूमध्ये त्याचे सरकार येण्याची शक्यता कमी आहे. केरळमध्येही खूप मते मिळाली आहे. केवळ कर्नाटक आणि तेलंगणामध्ये, दक्षिण भारतात प्रतिस्पर्ध्यांचा सामना करण्यासाठी काँग्रेसकडे बऱ्यापैकी ताकद असल्याचे दिसते. दुसरीकडे, जयललिता यांच्या निधनानंतर द्रमुकमधील नेतृत्वाच्या भांडणाचा फायदा घेत तामिळनाडूमध्ये पाय रोवण्याचे प्रयत्न भाजप करत आहे. केरळमधील कम्युनिस्टांच्या बालेकिल्ल्यात ताकद मिळवण्याचेही त्यांचे लक्ष्य आहे. स्थानिक समुदाय-आधारित राजकारणामुळे, भारतीय जनता पक्ष आंध्र प्रदेशात जे काही आहे ते गमावत आहे. त्यात सुधारणेची गरज आहे.

हेही वाचा : Karnataka Polls : पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटक दौऱ्यावर, बेंगळुरू-म्हैसूर एक्स्प्रेस वेच्या 118 किलोमीटर लांबी रस्त्याचे उद्घाटन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.