नवी दिल्ली - लोक कोरोना महामारीने त्रस्त असताना भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे मुलभूत कर्तव्य आणि जबाबदारी सोडली आहे, अशा कठोर शब्दांत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी टीका केली आहे. त्या काँग्रेसच्या संसदीय बैठकीत बोलत्या होत्या.
देशातील विविध मतदारसंघात कोरोनाची स्थिती व त्यावर काय उपाययोजना घेण्यात येत आहेत, हे जाणून घेण्यासाठी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी संसदेमधील खासदार व आमदारांची बैठक बोलाविली. यावेळी त्यांना मोदी सरकारवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, की आम्हाला स्पष्ट करू द्या, व्यवस्था अपयशी ठरली नाही. मोदी सरकारला भारताची मोठी शक्ती आणि संसाधने प्रभावीपणे वापरता आली नाहीत. मी ठामपणे म्हणते, की भारत हा राजकीय नेतृत्वामुळे अशक्त झाला आहे. या नेतृत्वाला लोकांबद्दल सहानुभूती नाही. मोदी सरकार हे लोकांसाठी अपयशी ठरले आहे.
हेही वाचा-आईच्या मदतीने दोन सख्ख्या भावांचा तरुणीवर बलात्कार; तब्बल पाच वर्षांपासून सुरू होता प्रकार
लोकांचे मृत्यू वेदनादायी-
भारत हा आरोग्याच्या भयानक आपत्तीमधून जात आहे. हजारो जणांचा मृत्यू झाला आहे. लाखो लोक हे आरोग्याच्या पायाभूत सुविधा, जीवरक्षणक औषधे, ऑक्सिजन आणि लस घेण्यासाठी संघर्ष करत आहेत. लोक हे जगण्यासाठी संघर्ष करताना रुग्णालय, रस्ते व वाहनांमध्ये मृत्यू पावत असल्याचे वेदनादायी आहे.
हेही वाचा-राजस्थान : बोरवेलमध्ये पडलेल्या चिमुरड्याला वाचवण्यात यश! २० तास चालली मोहीम
मोदी सरकारकडून कोरनाच्या दुसऱ्या लाटेच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष
केंद्र सरकारच्या सक्षमीकरण गटांनी आणि कोरोनावरील नॅशनल टास्क फोर्सने दुसऱ्या लाटेचा इशारा दिला होता. नियोजन करण्याची त्यांनी मोदी सरकारला विनंती केली होती. एवढेच नव्हे तर आरोग्य विषयावरील संसदेच्या स्थायी समिती आणि विरोधी पक्षांनीही कोरोनाच्या संकटाच्या तयारीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली होती. मात्र, वर्षाच्या सुरुवातीला पंतप्रधानांनी उद्धटपणे थापा मारत महामारीला हरविल्याचे सांगितले. त्यांच्या पक्षानेही आज्ञाधारकपणे तथाकथित यश मिळविल्याबद्दल मोदींचे कौतुक केले, अशी खरमरीत टीकाही गांधी यांनी केली.
हेही वाचा-आत्महत्येतही महाराष्ट्र अव्वल! 2019 मध्ये 18,916 जणांनी संपविले जीवन!
भाजप सरकारांकडून मदत मागणाऱ्यांना अटक
यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशमधील योगी सरकावरही टीका केली. संकटात सापडलेल्या रुग्णांना मदत करण्याऐवजी काही भाजप सरकारांनी सरकारी सत्तेचा वापर करत मदत मागणाऱ्यांना अटक केली आहे. जे नागरिकांचे गट मदत करत आहेत, त्यांच्यावरही या भाजप सरकारांनी कारवाई केल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी केला.
कोरोनाची लढाई राजकारणापलीकडील आहे-
संसदेने केंद्रीय आर्थिक संकल्पात मोफत लसीकरणासाठी 35,000 कोटी रुपयांच्या तरतुदीला मंजुरी दिली आहे. मात्र, केंद्र सरकारने लशींच्या किमतीत फरक करून राज्य सरकारांवरील आर्थिक ताण वाढविला आहे. लशींमधील भेदभावामुळे अनेक मागास, आदिवासी, इतर मागास आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हे लशींपासून वंचित राहतील,अशी भीती सोनिया गांधी यांनी व्यक्त केली आहे. कोरोनाशी लढायचे म्हणजे सरकारविरोधात आम्ही आहोत, असा आमचा विश्वास नाही. तर आम्ही विरोधात कोरोना, अशी ही लढाई आहे. ही लढाई राजकारणापलीकडील आहे. आपल्याला एक देश म्हणून एकत्रितपणे लढाई करावी लागणार असल्याचे मत सोनिया गांधी यांनी व्यक्त केले.