ETV Bharat / bharat

Modi Cabinet Expansion : दिल्लीत राजकीय हालचालींना वेग; राणे-कराड-पाटील दिल्लीत दाखल, सायंकाळी होणार मंत्रिमंडळ विस्तार

मंत्रिपदासाठी चर्चेत असलेले देशभरातील नेते राजधानीत दाखल झाले आहेत. राज्यातून मंत्रिमंडळावर वर्णी लागण्याची शक्यता असलेले नारायण राणे, भागवत कराड, कपिल पाटील, रणजितसिंह नाईक निंबाळकर, सुभाष भामरे, भारती पवार, हीना गावित हे नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. यासोबतच ज्योतिरादित्य शिंदे, सर्वानंद सोनोवाल, पशुपती पारस, वरुण गांधी या नेत्यांचाही मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याची चर्चा आहे.

Modi Cabinet Expansion : दिल्लीत राजकीय हालचालींना वेग; राणे-कराड-पाटील दिल्लीत दाखल, सायंकाळी होणार मंत्रिमंडळ विस्तार
Modi Cabinet Expansion : दिल्लीत राजकीय हालचालींना वेग; राणे-कराड-पाटील दिल्लीत दाखल, सायंकाळी होणार मंत्रिमंडळ विस्तार
author img

By

Published : Jul 7, 2021, 1:11 PM IST

Updated : Jul 7, 2021, 3:07 PM IST

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत राजकीय हालचालींना वेग आला असून मंत्रिपदासाठी चर्चेत असलेले देशभरातील नेते राजधानीत दाखल झाले आहेत. राज्यातून मंत्रिमंडळावर वर्णी लागण्याची शक्यता असलेले नारायण राणे, भागवत कराड, कपिल पाटील, रणजितसिंह नाईक निंबाळकर, सुभाष भामरे, भारती पवार, हीना गावित हे नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. यासोबतच ज्योतिरादित्य शिंदे, सर्वानंद सोनोवाल, पशुपती पारस, वरुण गांधी या नेत्यांचाही मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याची चर्चा आहे.

28 नेत्यांना मिळणार संधी

मोदी मंत्रिमंळाच्या विस्तारावरून राजधानी दिल्लीतील वातावरण चांगलेच तापले असून देशभरातील दिग्गज नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारात 24 ते 28 नव्या नेत्यांना संधी मिळणार असल्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे. भाजपसह एनडीएच्या घटक पक्षातील नेत्यांनाही मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. ज्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची चर्चा होत आहे, ते नेते राजधानी दिल्लीत दाखल झाले आहेत. महाराष्ट्रातूनही अनेक नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. यात खासदार नारायण राणे, भागवत कराड, कपिल पाटील, रणजितसिंह नाईक निंबाळकर, सुभाष भामरे, भारती पवार, हीना गावित यांचा समावेश आहे.

हे नेते दिल्लीत दाखल

मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता असलेले देशभरातील अनेक नेतेही दिल्लीत दाखल झाले आहेत. यात काँग्रेसमधून भाजपत आलेले ज्योतिरादित्य शिंदे, सर्वानंद सोनोवाल, पशुपती पारस, वरुण गांधी, आरसीपी सिंह यांचा समावेश आहे. याशिवाय मध्यप्रदेशातून राकेश सिंह, यूपीतून अपना दलच्या अनुप्रिया पटेल, रिटा बहुगुणा जोशी, जफर इस्लाम यांच्या नावाची चर्चा आहे. उत्तराखंडमधून माजी मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत, अनिल बलुनी, बिहारमधून सुशील मोदी, आरसीपी सिंह, लल्लन सिंह यांचेही नाव चर्चेत आहे.

यांच्याही नावाची चर्चा

परवेश साहिब सिंह वर्मा, मीनाक्षी लेखी, ब्रिजेंद्र सिंह, राहुल कासवान, निशिथ प्रामाणिक, शांतनू ठाकूर आणि जगन्नाथ सरकार, अश्वीनी वैष्णव, जमयांग नामग्याल त्सेरिंग, प्रताप सिम्हा यांचीही नावे चर्चेत आहेत.

ही आहेत चर्चेतील नावे

1) नारायण राणे (महाराष्ट्र)

2) भागवत कराड (महाराष्ट्र)

3) कपिल पाटील (महाराष्ट्र)

4) हीना गावित (महाराष्ट्र)

5) रणजितसिंह नाईक-निंबाळकर (महाराष्ट्र)

6) सुभाष भामरे (महाराष्ट्र)

7) भारती पवार (महाराष्ट्र)

8) ज्योतिरादित्य शिंदे (मध्य प्रदेश)

9) राकेश सिंह (मध्य प्रदेश)

10) अनुप्रिया पटेल (उत्तर प्रदेश)

11) रिटा बहुगुणा जोशी (उत्तर प्रदेश)

12) जफर इस्लाम (उत्तर प्रदेश)

13) वरुण गांधी (उत्तर प्रदेश)

14) सुशील मोदी (बिहार)

15) आरसीपी सिंह (बिहार)

16) लल्लन सिंह (बिहार)

17) तीरथ सिंह रावत (उत्तराखंड)

18) अनिल बलुनी (उत्तराखंड)

19) परवेश साहेब सिंह वर्मा (दिल्ली)

20) मीनाक्षी लेखी (दिल्ली)

21) ब्रिजेंद्र सिंह (हरियाणा)

22) राहुल कासवान (राजस्थान)

23) निशित प्रामाणिक ( पश्चिम बंगाल)

24) शांतनू ठाकूर ( पश्चिम बंगाल)

25) जगन्नाथ सरकार ( पश्चिम बंगाल)

26) अश्वीनी वैष्णव (ओडिशा)

27) सर्वानंद सोनोवाल (आसाम)

28) जामयांग नामग्याल त्सेरिंग (लडाख)

29) प्रताप सिन्हा (कर्नाटक)

हेही वाचा - भारताचं 'सर्वात तरुण' कॅबिनेट, केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार; महाराष्ट्रातून कोणाला मिळणार मंत्रिपद?

Last Updated : Jul 7, 2021, 3:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.