गाझियाबाद - रस्त्याने ये-जा करत असताना मोबाईल फोन वापरत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण, रस्त्याने पायी चालत जात असलेल्या युवतीच्या हातातील मोबाईल फोन दुचाकीवरून जाणाऱ्या चोरट्यांनी हिसकावून पळ काढल्याची घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्ही कैद झाली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. साहिबाबाद भागातील राजेंद्र नगर भागात ही घटना घडली.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसते की, तरुणी मोबाईलमध्ये पाहत पायी जात आहे. तेवढ्यात मागून एक दुचाकी येते आणि दुचाकीवर मागे बसलेला व्यक्ती काही कळायच्या आतच तीच्या हातातून महागडा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतो. त्यानंतर चोरटे फरार झाले.
पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून चोरट्यांना लवकरच अटक केली जाईल, असा दावा पोलिसांनी केला आहे. नुकतेचं लोणी, गाझियाबाद येथे, दरोडेखोरांनी 96 लाखांची लूट केली होती. पण या प्रकरणी पोलिसांनी अद्याप चोरांना बेड्या ठोकल्या नाहीत. लॉकडाऊनच्या काळातही चोरीच्या घटनामध्ये वाढ होत असून पोलिसांना चोरटे घाबरत नसल्याचे चित्र आहे.