ETV Bharat / bharat

Mobile Phone Exploded In Pocket : खिशात मोबाईलचा स्फोट होऊन लागली आग; वेळीच आग विझविल्याने वाचले प्राण

चहा घेत असताना वृद्धाच्या खिशात मोबाईलचा स्फोट झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना त्रिशूरमधील मारोट्टीचाल येथे गुरुवारी घडली. या अगोदरही केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातच आठ वर्षीय चिमुकलीचा मोबाईलचा स्फोट झाल्याने मृत्यू झाला होता.

Mobile Phone Exploded In Pocket
खिशात मोबाईलचा स्फोट
author img

By

Published : May 19, 2023, 9:50 AM IST

खिशात मोबाईलचा स्फोट होऊन लागली आग

त्रिशूर : हॉटेलमध्ये चहा घेत बसलेल्या वृद्धाच्या खिशात मोबाईल फोनने पेट घेऊन स्फोट झाल्याने चांगलीच खळबळ उडाली. ही घटना त्रिशूर येथील मारोट्टीचाल येथे गुरुवारी सकाळी घडली आहे. इलियास असे त्या खिशात मोबाईलचा स्फोट झालेल्या वृद्धाचे नाव आहे. त्रिशूर येथे वृद्धाच्या खिशात मोबाईलचा स्फोट झाल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. या अगोदरही केरळमध्ये एका आठ वर्षाच्या मुलीचा मोबईलचा स्फोट झाल्याने मृत्यू झाला होता.

चहा पिताना घडली घटना : इलियास हे 70 वर्षीय वृद्ध मारोट्टीचाल येथील एका हॉटेलमध्ये चहा पीत होते. यावेळी त्यांच्या खिशातील मोबाईल फोनने अचानक पेट घेऊन त्याचा स्फोट झाल्याने ते चांगलेच हादरले. स्फोटाचा आवाज ऐकताच इलियास यांनी खिशातील फोन काढून जमीनीवर फेकला. मात्र या दरम्यान त्यांच्या शर्टाने पेट घेतला होता. आजूबाजूच्या नागरिकांनी लगेच शर्टाची आग नियंत्रीत केल्याने इलियास हे बालंबाल बचावले.

मोबाईलची बॅटरी खराब : इलियास यांनी एका वर्षापूर्वी त्रिशूर येथील एका दुकानातून एक हजार रुपयाला हा फोन विकत घेतला होता. सामान्य की पॅडवर काम करणाऱ्या फोनचा स्फोट झाला आहे. फोनची बॅटरी निकामी होणे हे स्फोटाचे कारण असल्याचा प्राथमिक निष्कर्ष वर्तवण्यात येत आहे.

चिमुकलीचा गेला बळी : त्रिशूर येथील मारोट्टीचालमध्ये इलियास यांच्या खिशात मोबाईलचा स्फोट झाल्याने चांगलीच खळबळ उडाली. मात्र या अगोदर 25 एप्रिल रोजी त्रिशूर जिल्ह्यातील थिरुविलवामाला येथे मोबाईल फोनचा स्फोट झाला होता. या स्फोटात एका आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. आदित्यश्री या इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा पत्तीपरंबा मरियममन कोविलजवळील घरात मृत्यू झाला. फोनचा स्फोट झाला तेव्हा मुलगी तिच्या मोबाईलवर व्हिडिओ पाहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.

हेही वाचा -

  1. Assistant Professor Suicide Case : असिस्टंट प्रोफेसर आत्महत्या प्रकरणात पाकिस्तान कनेक्शन, आत्महत्येप्रकरणी धक्कादायक खुलासा
  2. Bilaspur Kidney Theft : किडनी चोरीच्या आरोपावरून जिल्हाधिकाऱ्यांनी मृतदेह काढला बाहेर
  3. Kota Online Fraud Case : मुंबईत बनावट फर्म करून शेअर मार्केटच्या नावाने फसवणूक; पोलिसांनी पाच आरोपीच्या आवळल्या मुसक्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.