जौनपूर - राजकारण आणि बॉलीवूड यांचा संबंध काही नवा नाही. अनेक अभिनेत्यांनी राजकारणी म्हणून नाव कमावले आहे. 2015 मध्ये सौंदर्य स्पर्धेची रनर अप राहिलेली दीक्षा सिंह थेट जिल्हा परिषद पंचायत निवडणुकीत उतरली आहे. दीक्षा सिंह यानिमित्ताने राजकारणात प्रवेश करणार आहे. दीक्षा सिंह यावेळी जिल्हा परिषद पंचायत निवडणुकीत नशीब आजमावत आहे. ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी दीक्षा सिंहची खास मुलाखत घेतली. यावेळी तीने गावातील समस्यांवर भाष्य केले. जौनपूर जिल्हा पंचायतीच्या प्रभाग क्रमांक 26 मधून दीक्षा सिंहने रविवारी अर्ज दाखल केला.
घराघरात सुविधा पोहोचवायच्या असतील तर पंचायत निवडणुका सर्वात महत्वाच्या आहेत. पंचायत निवडणुकीत भू-स्तरीय कामे करता येतात, असे तीने सांगितले. मुलींचे काम फक्त लग्न करणे आणि मुलांना जन्म देणे नाही. मुलींनाही स्वप्ने असतात आणि त्यांनाही स्वप्ने सत्यात उतरवण्याचा हक्क आहे. त्यामुळे महिला समक्षीकरण वाढवण्यावर भर देणार असल्याचे ती म्हणाली. तसेच मॉडेलिंग बद्दल प्रश्न विचारला असता ती म्हणाली, की रील लाइफ आणि रिअल लाइफमध्ये मोठा फरक आहे. रील लाइफपेक्षा रिअल लाइफ हे खूप सोपे आहे. रील लाइफमध्ये नक्कीच स्टारडम आहे, परंतु यासाठी बरीच मेहनत करावी लागते, असे तीने सांगितले.
जौनपूरमधील पंचायत निवडणूक 15 एप्रिलला पार पडणार आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सदस्य पदासाठी रिंगणात आहे. दीक्षा सिंहसमोर भाजपा नेते चंद्रसिंग यांच्या सुनेचं आव्हान असणार आहे. दीक्षा 2015 मध्ये मिस इंडिया स्पर्धेत सहभागी झाली होती. यावेळी ती अखेरच्या फेरीपर्यंत पोहोचली होती. दीक्षाने तीसरीपर्यंतचे शिक्षण गावातून घेतले आहे.
हेही वाचा - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक : ममतांचे केंद्रीय दलांवरील आरोप चुकीचे; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण