नवी दिल्ली - संसदेत 11 ऑगस्ट रोजी झालेल्या गोंधळाचे माध्यमांसमोर वर्णन करताना काँग्रेसचे राज्यसभा खासदार छाया वर्मा आणि फुलो देवी नेतम यांना रडू कोसळले. पुरुष मार्शलनी महिला खासदारांना धक्काबुक्की केली. हा महिलांचा अपमान आहे, असे त्या म्हणाल्या. काँग्रेस प्रदेश कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
मला पुरुष मार्शलनी मला ढकलले आणि त्यानंतर मी खाली पडले. मी मध्यस्ती करण्यास गेले असताना माझ्याबाबत हा प्रकार घडला आहे. मध्यस्तीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असताना सभागृहात जमिनीवर पडले, असे काँग्रेस खासदार छाया वर्मा म्हणाल्या. या दोन्ही खासदारांनी सरकारकडे त्या दिवसाच्या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ प्रसिद्ध करण्याची मागणी केली आहे. काँग्रेसने या विषयावर निदर्शने करण्याची घोषणा केली आहे.
नेमकं काय झालं होतं?
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राज्यसभेत पेगासस आणि कृषी कायद्यांवरुन विरोधकांनी जोरदार गदारोळ घातला होता. यावेळी काही विरोधी खासदार टेबलावर चढले. या गोंधळानंतर मार्शलना बोलावण्यात आले. मार्शलांनी गोंधळ घालणाऱ्या खासदारांना सभागृहाबाहेर काढले. यावेळी मार्शल यांना बोलावून खासदारांसोबत गैरवर्तन करण्यात करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला.
हेही वाचा - तो सदस्यांवरील हल्लाच होता.. संसदेच्या इतिहासात महिला खासदारांना पहिल्यांदाच धक्काबुक्की
हेही वाचा - VIDEO : ..तो संसद सदस्यांवरील हल्लाच होता, शरद पवारांनी सांगितली राज्यसभेतील आँखो देखी