ETV Bharat / bharat

Satyendra Jain Money Laundering case : दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना 13 जूनपर्यंत ईडी कोठडी - Satyendra Jain ED custody

मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले दिल्ली सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन ( Satyendra Jain to ED custody ) यांना 13 जूनपर्यंत न्यायालयाने ईडीची कोठडी सुनावली. ( Satyendra Jain Money Laundering case ) न्यायालयाच्या आदेशानंतर जैन त्यांची प्रकृती खालवल्याने ( Satyendra Jain's health deteriorated ) त्यांना राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Rouge Avenue Court Delhi
राऊज एवेन्यू कोर्ट दिल्ली
author img

By

Published : Jun 9, 2022, 11:41 AM IST

Updated : Jun 9, 2022, 5:17 PM IST

नवी दिल्ली : मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले मंत्री सत्येंद्र जैन ( Minister Satyendra Jain in the Delhi Government ) यांना 13 जूनपर्यंत राऊस अॅव्हेन्यू न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. ( Satyendra Jain Money Laundering case ) त्यांना 30 मे रोजी ईडीने ( Enforcement Directorate ) अटक केली होती.

13 जूनपर्यंत ईडीच्या कोठडीत रवानगी - आज त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांची 13 जूनपर्यंत ईडीच्या कोठडीत रवानगी करण्यात आली. सुनावणीदरम्यान ईडीने सत्येंद्र जैन यांना पाच दिवसांची कोठडी द्यावी अशी मागणी न्यायालयाला केली. जैन चौकशीत सहकार्य करत नाहीत. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेणे बाकी असल्याचे ईडीने न्यायालयात सांगितले.

जैन यांच्या वकिलांचा दावा - न्यायालयाच्या आदेशानंतर सत्येंद्र जैन त्यांची प्रकृती खालवल्याने त्यांना राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जैन यांची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी सांगितले की, सत्येंद्र जैन यांना अनेक आजार आहेत. नऊ दिवसांच्या चौकशीनंतरही ईडी ( Enforcement Directorate ) कोठडी मागत आहे. दिलेल्या वेळेचा ईडीने सदुपयोग केला नाही असा युक्तिवाद जैन यांच्या वकिलांनी न्यायालयात केला.

हेही वाचा- BJP to field sixth candidate for Assembly elections? : विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजप सहावा उमेदवार रिंगणात उतरवणार?

Last Updated : Jun 9, 2022, 5:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.