ETV Bharat / bharat

Shivsena MLAs in Surat Update : गुजरातच्या 'या' हॉटेलमध्ये सेना आमदारांचा मुक्काम , आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता

विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेतील अंतर्गत धूसफूस समोर आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे सोमवारी (दि. 20 जून) सायंकाळपासून नॉट रिचेबल आहेत. त्यांच्यासोबत डझनभर आमदार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. सर्वजण सुरतच्या ग्रँड भगवती या हॉटेलमध्ये सर्व जण असल्याची माहिती मिळत आहे.

हॉटेल परिसर
हॉटेल परिसर
author img

By

Published : Jun 21, 2022, 10:44 AM IST

Updated : Jun 21, 2022, 12:34 PM IST

सुरत ( गुजरात ) - विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेतील अंतर्गत धूसफूस समोर आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे सोमवारी (दि. 20 जून) सायंकाळपासून नॉट रिचेबल आहेत. त्यांच्यासोबत डझनभर आमदार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. सर्वजण सुरतच्या ग्रँड भगवती या हॉटेलमध्ये सर्व जण असल्याची माहिती मिळत आहे.

मोठ्या पोलीस बंदोबस्त - हॉटेलमधील सर्व खोल्या बूक झालेल्या आहेत. हॉटेलमध्ये कोणीही जाऊ नये यासाठी हॉटेलच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्या ठिकाणी कोणालाही जाऊ दिले नाही.

आढावा घेताना प्रतिनिधी

शिवसेनेचे घटक पक्ष मिळून 12 तर काँग्रेसची 3 मत फुटली - शिवसेनेचे सचिन अहिर आणि आमशा पाडवी विधान परिषद निवडणुकीत विजयी झाले. मात्र शिवसेनेची स्वत:ची आणि सहयोगी पक्ष आणि अपक्षांची तब्बल 12 मते फुटली. शिवसेनेचे 55 आमदार आहेत. प्रहार संघटनेचे 2, मंत्री शंकरराव गडाख आणि अपक्ष सहा अशी मिळून शिवसेनेकडे एकूण मतांची संख्या 64 इतकी आहे. मात्र, शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना मिळून 52 मते मिळाली आहेत. त्यामुळे शिवसेनेचे 3 आणि घटक पक्षांची 9 अशी 12 मते फुटली. तर काँग्रेसचे देखील 3 आमदार फुटले. भाजपच्या प्रसाद लाड यांना मतांचा फायदा झाल्याचे दिसून येते. मात्र देवेंद्र फडणवीस यांची रणनिती आघाडी सरकारपुढे सरस ठरल्याचे दिसून येते.

राऊत यांचा दिल्लीत दौरा रद्द - दरम्यान, या सर्व घडामोडीनंतर शिवसेनेत खळबळ उडाली असून संजय राऊत यांनी आपला दिल्ली दौरा रद्द केला असून बंडाळी रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न शिवसेनेचे नेते करत आहेत.

हेही वाचा - वाझेला पुन्हा पोलीस सेवेत घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा दबाव, परमबीर सिंग यांचा सीबीआयला जबाब

Last Updated : Jun 21, 2022, 12:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.