ETV Bharat / bharat

हवाईप्रवास महागणार.. भाड्यामध्ये १० ते १५ टक्के दरवाढ करण्याचे 'स्पाईसजेट'चे संकेत

इंधनाचे दर सातत्याने वाढत असल्याने ( sharp increase in jet fuel prices ) प्रवासी भाड्यात 10 ते 15 टक्के वाढ करणे आवश्यक असल्याचे स्पाइसजेटने म्हटले ( Air travel likely to become expensive ) आहे.

spicejet
स्पाईसजेट
author img

By

Published : Jun 16, 2022, 12:55 PM IST

नवी दिल्ली : विमान प्रवास लवकरच महाग होऊ शकतो. खासगी विमान कंपनी स्पाइसजेटने इंधनाच्या वाढत्या किमती ( sharp increase in jet fuel prices ) आणि घसरणाऱ्या रुपयावर चिंता व्यक्त करत हे संकेत दिले ( Air travel likely to become expensive ) आहेत. खरं तर, तेल विपणन कंपन्यांनी गुरुवारी एव्हिएशन टर्बाइन इंधन (एटीएफ) 16.3 टक्क्यांनी वाढवले ​​आहे. त्यामुळेच आता 10 ते 15 टक्के भाडे वाढवण्याची गरज असल्याचे कंपनीच्या निवेदनात म्हटले आहे.

पर्यायच उरला नाही : स्पाइसजेटचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग यांनी गुरुवारी सांगितले की, इंधनाच्या किमतीत झालेली वाढ आणि रुपयाचे अवमूल्यन यामुळे देशांतर्गत विमान कंपन्यांकडे तातडीने विमान भाडे वाढवण्याशिवाय पर्याय उरला नाही. सिंग यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ऑपरेटिंग कॉस्ट परवडण्याजोगी राहण्यासाठी विमान भाडे किमान 10 ते 15 टक्क्यांनी वाढवणे आवश्यक आहे.

  • Sharp increase in jet fuel prices & depreciation of Rupee have left domestic airlines with little choice but to immediately raise fares&we believe that a min 10-15% increase in fares is required to ensure that cost of ops are better sustained: Ajay Singh, CMD,SpiceJet

    (File pic) pic.twitter.com/wNeofrmC9S

    — ANI (@ANI) June 16, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

इंधनाच्या किमतीत सातत्याने वाढ : कोरोना विषाणूच्या महामारीमुळे मार्च २०२० मध्ये दोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर २५ मे २०२० रोजी हवाई सेवा पूर्ववत करण्यात आली, तेव्हा सरकारने उड्डाण कालावधीच्या आधारे देशांतर्गत विमान भाड्याची कमी आणि जास्त मर्यादा निश्चित केली होती. या वर्षी 24 फेब्रुवारीपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून इंधनाच्या किमती सातत्याने वाढत आहेत.

सिंह म्हणाले, 'जून 2021 पासून विमान इंधनाच्या किमतीत 120 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. किमतीतील ही प्रचंड वाढ शाश्वत नाही आणि केंद्र आणि राज्य सरकारने विमानाच्या इंधनावरील कर कमी करण्यासाठी तातडीने पावले उचलली पाहिजेत. गेल्या काही महिन्यांत या इंधन दरवाढीचा जास्तीत जास्त भार आम्ही उचलण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणाले की, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन कमकुवत झाल्याने विमान कंपन्यांवरही मोठा परिणाम झाला आहे.

हेही वाचा : Jay Kotak : अमेरिका म्हणजे रसातळाला जात असलेले राष्ट्र.. विमानतळावरील गर्दीवरून जय कोटक नाराज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.