ETV Bharat / bharat

Encounter In Pulwama : दक्षिण काश्मीरमध्ये चकमक; एका अज्ञात दहशतदी ठार केल्याचा पोलिसांचा दावा

author img

By

Published : Mar 15, 2022, 1:18 PM IST

Updated : Mar 15, 2022, 1:34 PM IST

जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी मंगळवारी दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथील चारसू गावात सुरू असलेल्या गोळीबारात एका अज्ञात दहशतवाद्याला ठार केल्याचा दावा केला आहे. ही चकमक अवंतीपोराच्या चारसू या भागात झाली. सध्या पोलीस आणि सुरक्षा दल आपल्या कर्तव्यावर आहेत. अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली.

पुलवामामध्ये चकमक
पुलवामामध्ये चकमक

श्रीनगर - जम्मू-काश्मीर पोलिसांनी मंगळवारी दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील चारसू भागात सुरू असलेल्या गोळीबारात एका अज्ञात दहशतवाद्याला ठार मारल्याचा दावा केला आहे. (Militant killed in ongoing Pulwama encounter) एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, एक अज्ञात अतिरेकी मारला गेला असून त्याची ओळख पटवली जात आहे. परिसरात अजूनही कारवाई सुरू आहे.

व्हिडिओ

ही चकमक अवंतीपोराच्या चारसू या भागात झाली

पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने परिसरात दहशतवाद्यांच्या उपस्थितीबद्दल विशिष्ट माहितीवर एक घेराबंदी आणि शोध ऑपरेशन (CASO) सुरू केले. यामध्ये सैन्याची संयुक्त टीम संशयित जागेच्या दिशेने येताच लपलेल्या अतिरेक्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला, ज्याला प्रत्युत्तर देण्यात आले आणि चकमक सुरू झाली. ही चकमक अवंतीपोराच्या चारसू या भागात झाली. सध्या पोलीस आणि सुरक्षा दल आपल्या कर्तव्यावर आहेत. याबाबत माहिती आणखी पुढे येण्याची शक्यता आहे, असेही पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

गोळीबार सुरू झाला

श्रीनगर-जम्मू महामार्गालगत असलेल्या गावात अतिरेकी असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि काही वेळातच गोळीबार सुरू झाला अशी माहितीही पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

अधिक तपसील कळू शकला नाही

सुरक्षा दलांनी चकमकीच्या ठिकाणी जाणारे सर्व प्रवेश आणि निर्गमन बिंदू सील केले जेणेकरून लपलेले अतिरेकी गोळीबाराच्या दरम्यान पळून जाऊ नयेत. तसेच, येथे अडकलेल्या अतिरेक्यांची संख्या तसेच, अधिक तपसील कळू शकला नाही असही ते यावेळी म्हणाले आहेत.

हेही वाचा - Hijab Controversy Verdict : हिजाब बंदीमुळे मुस्लीम मुली शिक्षणापासून दूर जातील - खा. इम्तियाज जलील

Last Updated : Mar 15, 2022, 1:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.