ETV Bharat / bharat

भारतीय सुरक्षा दलाची मोठी कारवाई; चीनी पिस्तूलासह एका दहशतवाद्याला अटक

जम्मू काश्मीरच्या सुरक्षा दलाने मोठी कारवाई करत तीन चीनी पिस्तूल, 2 मॅग्झीन आणि 15 जिवंत काडतूसे आणि एका सायलेन्सरसह दहशतवाद्याला अटक केली आहे.

जम्मू काश्मीर
जम्मू काश्मीर
author img

By

Published : Mar 13, 2021, 12:36 PM IST

डोडा - जम्मू काश्मीरच्या सुरक्षा दलाने मोठी कारवाई करत एका दहशतवाद्याला अटक केली आहे. या दहशतवाद्याकडून तीन चीनी पिस्तूल, 2 मॅग्झीन आणि 15 जिवंत काडतूसे आणि एक सायलेन्सर जप्त केले आहे. जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांनी संयुक्तपणे कॉर्डन आणि शोधमोहीम राबवण्यात आली होती. यादरम्यान दहशतवाद्याला डोडातील बखेरियन गावातून ताब्यात घेतले आहे.

गुलाम अहमद नामक व्यक्तीच्या घरातून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. तर दहशताद्याची ओळख फिरदौस अहमद नावाने झाली आहे. जम्मू काश्मीर पोलीस दहशतवाद्याची चौकशी करत आहे.

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांच्या विरोधात सावधपणे कारवाई केली जात आहे. गेल्या गुरुवारी म्हणजे 11 मार्चला अनंतनाग जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलाने जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना ठार केले. दहशतवाद्यांच्या ठिकाणांची माहिती झाल्यानंतर त्यांना आत्मसमर्पण करण्याची संधी दिली होती. मात्र, त्यांनी सुरक्षादलावर गोळीबार केला. आदिल अहमद भट आणि जाहिद अहमद राठेर असे मृत दहशतवाद्यांचे नाव आहे.

हेही वाचा - आर्थिक कारणांमुळे एकाच कुटुंबातील पाच जणांची आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.