ETV Bharat / bharat

पंजाबमध्ये मिग-२१ कोसळून ३० वर्षीय स्कॉड्रन लिडर मृत्युमुखी, दीड वर्षांपूर्वी झाले होते लग्न

भारतीय वायु सेना का मिग 21 लड़ाकू विमान देर रात दुर्घटनाग्रस्त हो गया. IAF अधिकारी ने जानकारी दी.

MiG-21 fighter aircraft crashed near Moga in Punjab
पंजाबच्या मोगामध्ये कोसळलं हवाई दलाचं मिग-२१ विमान
author img

By

Published : May 21, 2021, 8:23 AM IST

Updated : May 22, 2021, 1:40 PM IST

08:47 May 21

चंदीगड : देशाच्या हवाई दलाच्या मिग-२१ लढाऊ विमानाचा गुरुवारी रात्री उशीरा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या सूरदगढमधून या विमानाने उड्डाण केले होते. मात्र, पंजाबमधील मोगा जिल्ह्यात असणाऱ्या लंगियाना खुर्द गावाजवळ हे विमान कोसळले.

08:19 May 21

पंजाबमध्ये मिग-२१ कोसळून ३० वर्षीय स्कॉड्रन लिडर मृत्युमुखी, दीड वर्षांपूर्वी झाले होते लग्न

पंजाबच्या मोगामध्ये कोसळलं हवाई दलाचं मिग-२१ विमान

या अपघातात पायलट ३० वर्षीय अभिनव चौधरी यांना वीरमरण आले आहे, अशी माहिती हवाई दलाने ट्विट करत दिली. त्यांच्या कुटुंबियांसोबत आपण उभे असल्याचे हवाई दलाने म्हटले आहे. दरम्यान अपघातानंतर ग्रामस्थ, प्रशासन आणि लष्कराचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. हे विमान अपघातात जवळपास पूर्णपणे जळून खाक झाले. विशेष म्हणजे, दीड वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते.

मिग-२१ विमाने ही कधी काळी भारतीय हवाई सेनेचा कणा मानली जात होती. आता या विमानांचे केवळ चार स्क्वॉड्रन शिल्लक आहेत. आता ही विमाने ना युद्धासाठी, ना प्रशिक्षणासाठी योग्य आहेत. यातील काही विमानांचे अपग्रेड केल्यामुळे ती प्रशिक्षणासाठी वापरली जात आहेत. बालाकोट एअरस्ट्राईकनंतर मिग-२१ बायसन विमानांनी पाकिस्तानी लढाऊ विमानांना चांगलेच तोंड दिले होते. हे खरे असले, तरी या विमानांचे वारंवार अपघात होत असल्याचेही समोर आले आहे. कित्येक जवानांना या अपघातांमध्ये वीरमरण आल्यामुळे, आता या विमानांचा वापर थांबवण्याची मागणी करण्यात येत आहे.

यापूर्वी ५ जानेवारीलाही राजस्थानच्या श्रीगंगानगरमधील सूरतगढमध्ये एक मिग-२१ कोसळले होते. या अपघातात सुदैवाने पायलटला कोणतेही नुकसान झाले नव्हते. १९६० सालापासून भारतीय हवाई दल मिग-२१ विमानांचा वापर करत आहे.

हेही वाचा : गाझा पट्ट्यातील हिंसाचाराला पूर्णविराम; इस्राईल-हमासची शस्त्रसंधीस मान्यता

Last Updated : May 22, 2021, 1:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.