ETV Bharat / bharat

Goa Election: बारदेशचे आमदार आणि मंत्री मायकल लोबो यांचा राजीनामा; भाजपाला मोठा धक्का - Goa Election Latest Update

आमदार मायकल लोबो (MLA Michael Lobo Resign ) यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला मोठा धक्का मानला जात आहे. ते कोणत्या पक्षात जाणार याचा खुलासा त्यांनी अद्याप केला नसला तरी ते कॉंग्रेसमध्ये जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Michael Lobo
मायकल लोबो
author img

By

Published : Jan 10, 2022, 7:25 AM IST

Updated : Jan 10, 2022, 3:10 PM IST

पणजी: बारदेश तालुक्यातील आमदार आणि मंत्री मायकल लोबो यांनी आज (MLA Michael Lobo Resign ) आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. हा ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. राजीनामा दिल्यानंतर ते नेमकं कोण्यत्या पक्षात जाणार याचा खुलासा त्यांनी अद्याप केला नसला तरी ते कॉंग्रेसमध्ये जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  • I've resigned as Goa minister; hope people of Calangute constituency will respect my decision. I'll also resign as MLA,will see what step to take next. I'm in talks with other political parties. I was upset with the way we're looked at&party workers are unhappy: Michael Lobo, BJP pic.twitter.com/SvuUaCIocm

    — ANI (@ANI) January 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

...म्हणून दिला राजीनामा -

शिवोलीम मतदारसंघातून मायकल लोबो यांच्या पत्नी डिलियाना लोबो निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, भाजपाने तिकीट देण्यास नकार दिल्याने मंत्री मायकल लोबो यांनी मागच्या काही महिन्यांपासून शिवोली मतदारसंघात आपले काम वाढविले आहे. डिलियाना लोबो या स्वतः आपला जनसंपर्क वाढवीत आहेत. मात्र, यामुळे येथील स्थानिक भाजपा उमेदवार आणि माजी मंत्री दयानंद मांडरेकर आणि लोबो यांच्यात अनेक वेळा वाद झाले आहेत. भाजपाने तिकीट देण्यास मनाई केल्यामुळे नाराज लोबो यांनी काँग्रेसमध्ये सपत्नीक प्रवेश करून येथून स्वतः कळणगुट आणि पत्नी डिलियाना यांना शिवोलीम मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणुकीत उतरवायचे ठरविले आहे.

भाजपाला धक्का -

मंत्री मायकल लोबो हे राज्यातील आर्थिकदृष्या सक्षम असेलेले नेते मानले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली बारदेश तालुक्यातील 4 ते 5 जागा निवडून आणण्याची क्षमता त्यांच्यात आहे. त्यामुळे याचा फटका भाजपाच्या उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोबो यांच्या काँग्रेसमध्ये जाण्याने बारदेश तालुक्यातील भाजपाचे प्राबल्य कमी होऊन त्याचा फायदा काँग्रेसला होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हेही वाचा: Goa Congress Candidate Second List : गोव्यात काँग्रेसच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

Last Updated : Jan 10, 2022, 3:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.