ETV Bharat / bharat

मेट्रोमॅन ई.श्रीधरन पलक्कड मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता - कोण आहेत ई श्रीधरन

मेट्रोमॅन ई.श्रीधरन यांनी नुकतचं भाजपामध्ये प्रवेश केला आहे. पलक्कड या मतदारसंघातून भाजपासाठी श्रीधरन निवडणूक लढण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

मेट्रोमॅन ई.श्रीधरन
मेट्रोमॅन ई.श्रीधरन
author img

By

Published : Mar 12, 2021, 8:41 AM IST

कोची - केरळमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मेट्रोमॅन ई.श्रीधरन यांनी नुकतचं भाजपामध्ये प्रवेश केला आहे. पलक्कड या मतदारसंघातून भाजपासाठी श्रीधरन निवडणूक लढण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. देशातील अनेक मोठ्या मेट्रो प्रकल्पासाठी काम केल्याने पद्म विभूषण ई.श्रीधरन यांची मेट्रोमॅन अशी ओळख आहे. राज्य निवडणूक समितिने श्रीधरन यांना पलक्कड मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा सल्ला दिल्याची माहिती आहे. आजपासून श्रीधरन पलक्कड मतदासंघात प्रचार मोहीम सुरू करणार आहेत.

मी सध्या मल्लापूरममध्ये राहतो. या जवळपासच्या मतदारसंघातून मला निवडणूक लढण्याची इच्छा आहे. प्रत्येक मतदारापर्यंत माझा संदेश पोहचवण्याचा प्रयत्न करेल, असे एका वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते म्हणाले. श्रीधरन भारतीय जनता पक्षाकडून केरळच्या मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपा केरळ विधानसभा निवडणूक लढणार असल्याची माहिती आहे. भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर श्रीधरन यांनी आक्रमक भूमिका घेतल्याची पाहयला मिळाले. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतूक केले. केरळमध्ये भष्ट्राचार वाढीस लागला असून तो संपवणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते. राज्यात भाजपाचेच सरकार स्थापन होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.

कोण आहेत ई श्रीधरन -

स्थापत्य अभियंता असणारे ई श्रीधरन कोलकाता ते दिल्ली मेट्रोसाठी मोठं योगदान दिलं आहे. तसेच दिल्ली मेट्रो अंमलबजावणीतही त्यांचा सिंहाचा वाटा आहे. श्रीधरन हे 1995 ते 2012 पर्यंत दिल्ली मेट्रोचे संचालक होते. मेट्रोमधून प्रवास करणं हे एक स्वप्न होतं. ते स्वप्न श्रीधरन यांनी सत्यात उतरवलं. त्यांच्या कामाच्या शैलीने सर्वांना प्रभावित केलं आहे. प्रत्येक काम वेळेच्या आत पूर्ण करणं हे त्यांच वैशिष्ट्य आहे. विकासकामांमधील योगदानासाठी त्यांना फ्रान्सने 'नाईट ऑफ दी लिजन ऑफ ऑनर' पुरस्काराने सम्मानित केले होते. तर भारत सरकारनं त्यांच्या कामासाठी ई. श्रीधरन यांना 2001 मध्ये पद्म आणि 2008 मध्ये पद्म विभूषण पुरस्काराने सम्मानित केले होते. तर टाईम मासिकाने त्यांना 'आशिया हिरो' असे संबोधले होते. याचबरोबर जपानने देखील त्यांना 2013 मध्ये ऑर्डर ऑफ रायझिंग सन पुरस्काराने गौरवलं होतं.

केरळ विधानसभा निवडणूक -

केरळ विधानसभा निवडणूक 2016 मध्ये पार पडली. 16 मे 2016 रोजी एकाच फेरीत घेण्यात आलेल्या या निवडणुकीमध्ये केरळ विधानसभेमधील सर्व 140 जागांसाठी आमदार निवडले गेले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीने 91 जागांवर विजयासह संपूर्ण बहुमत मिळवले व काँग्रेस पक्षाची सत्ता संपुष्टात आणली. या निवडणुकीत प्रथमच भाजपला केरळमध्ये एका जागेवर विजय मिळाला. तर आता येत्या 6 एप्रिलला मतदान होईल. तर निवडणुकीचे निकाल 2 मे 2021 ला लागतील.

भाजपाचे आव्हान -

सध्या केरळात माकपाच्या नेतृत्वात डावे पक्ष सत्तारुढ आहेत. सत्तेत येण्यासाठी भाजपाकडूनही जोरदार तयारी सुरू आहे. ‘मेट्रोमॅन’ ई. श्रीधरन यांची देशभरात ख्याती आहे. त्यामुळे त्यांचा फायदा भाजपाला होईल, असे दिसते. डाव्या आघाडीविरोधात भाजपा, कोरोना महामारीतील अपयश, ‘लव्ह जिहाद’ आणि शबरीमला हे मुद्दे उपस्थित करू शकते. एकूणच या निवडणुकीमध्ये केरळचे राजकारण ढवळून निघणार आहे.

हेही वाचा - गाझियाबादमध्ये मेडिकल प्रोडक्ट्स फॅक्टरीत भीषण आग ; 14 कामगार जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.