मुंबई : स्वयंपाकासाठी वापरले जाणारे तेल भेसळयुक्त असेल तर ते आपल्या आरोग्याला मोठे नुकसान ठरू शकते. त्याचे नियमित सेवन एखाद्या व्यक्तीचे आयुष्य कमी करू शकते. तेलातून नफा घेण्यासाठी त्यात भेसळ केली जाते. मात्र यामुळे तेलाची गुणवत्ता खराब होते, जे आरोग्यासाठी धोकादायक आहे. भेसळ करणारे तेलात पिवळ्या रंगाचे मेटिनलसारखा रंग किंवा त्यात ट्राय-ऑर्थो-क्रेसिल-फॉस्फेट (टीओसीपी) सारखे रासायनिक संयुग वापरतात.
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) अलीकडेच आपल्या ट्विटरवर दोन व्हिडिओ शेअर केले आहेत. या व्हिडिओंमध्ये तेलाची गुणवत्ता, तेलातील भेसळ तपासण्याची युक्ती सांगितली आहे.
अशी ओळखा तेलातील भेसळ
जर स्वयंपाकाच्या तेलात मेटनिलसारखा पिवळा रंग वापरला असेल तर तुम्ही ते सहज शोधू शकता. FSSAI नुसार, टेस्ट ट्यूबमध्ये सुमारे 1 मिली तेल घाला आणि सुमारे 4 मिली पाणी घाला. ते चांगले मिसळा. आता 2 मिली मिश्रण दुसऱ्या नळीत घाला आणि नंतर 2 मिली सांद्रित हायड्रोक्लोरिक अॅसिड घाला.
-
Detecting prohibited colour like metanil yellow Adulteration in Oil#DetectingFoodAdulterants_5#AzadiKaAmritMahotsav@jagograhakjago @mygovindia @MIB_India @PIB_India @MoHFW_INDIA pic.twitter.com/hFYqIwLHJ7
— FSSAI (@fssaiindia) September 8, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Detecting prohibited colour like metanil yellow Adulteration in Oil#DetectingFoodAdulterants_5#AzadiKaAmritMahotsav@jagograhakjago @mygovindia @MIB_India @PIB_India @MoHFW_INDIA pic.twitter.com/hFYqIwLHJ7
— FSSAI (@fssaiindia) September 8, 2021Detecting prohibited colour like metanil yellow Adulteration in Oil#DetectingFoodAdulterants_5#AzadiKaAmritMahotsav@jagograhakjago @mygovindia @MIB_India @PIB_India @MoHFW_INDIA pic.twitter.com/hFYqIwLHJ7
— FSSAI (@fssaiindia) September 8, 2021
ही प्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला दिसेल की शुद्ध तेलाच्या वरच्या थराचा रंग अजिबात बदलणार नाही. तर भेसळयुक्त तेलाच्या वरच्या थराचा रंग बदलेल. अशा प्रकारे आपण शुद्ध आणि भेसळयुक्त तेलामधील फरक सहजपणे ओळखू शकाल.
TOCP असलेले भेसळयुक्त तेल कसे शोधायचे?
FSSAI ने TOCP च्या मदतीने तयार केलेले भेसळयुक्त तेल तपासण्याची युक्तीही शेअर केली आहे. तेलात रासायनिक संयुग वापरले गेले आहे की नाही हे समजण्यासाठी, एक साधी चाचणी करा. सर्वप्रथम, दोन स्वतंत्र ग्लासमध्ये सुमारे 2 मिली तेल घ्या. यानंतर, दोन्ही ग्लासमध्ये लोण्याचा एक-एक छोटा तुकडा टाका.
-
Detecting Tri-ortho-cresyl-phosphate Adulteration in Oil.#DetectingFoodAdulterants_6#AzadiKaAmritMahotsav@jagograhakjago @mygovindia @MIB_India @PIB_India @MoHFW_INDIA pic.twitter.com/YLRp7NzfEa
— FSSAI (@fssaiindia) September 15, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Detecting Tri-ortho-cresyl-phosphate Adulteration in Oil.#DetectingFoodAdulterants_6#AzadiKaAmritMahotsav@jagograhakjago @mygovindia @MIB_India @PIB_India @MoHFW_INDIA pic.twitter.com/YLRp7NzfEa
— FSSAI (@fssaiindia) September 15, 2021Detecting Tri-ortho-cresyl-phosphate Adulteration in Oil.#DetectingFoodAdulterants_6#AzadiKaAmritMahotsav@jagograhakjago @mygovindia @MIB_India @PIB_India @MoHFW_INDIA pic.twitter.com/YLRp7NzfEa
— FSSAI (@fssaiindia) September 15, 2021
लोणी घालण्याच्या काही काळानंतर तुम्हाला शुद्ध तेलाच्या रंगात कोणताही बदल दिसणार नाही. पण भेसळयुक्त तेलाच्या वरच्या थराचा रंग बदलून लाल होईल. बाजारातून तेल विकत घेतल्यानंतर ते खाण्याआधी, आपण अशा प्रकारे तेलाची गुणवत्ता तपासावी.