ETV Bharat / bharat

Telangana Suicide News : सिनीयरला कंटाळून मेडिकल विद्यार्थीनीची आत्महत्या, तर फोटो व्हायरल केल्याने इंजिनिअरिंग विद्यार्थीनीने संपवले जीवन - Engineering student suicide in Warangal

तेलंगणामध्ये वरिष्ठांच्या छळाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मेडिकलच्या विद्यार्थ्यीनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तर दुसरीकडे तेलंगणातील वारंगलमध्ये एका अभियांत्रिकीच्या विद्यार्थीनीने देखील आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

Suicide Attempt in Warangal
आत्महत्येच्या प्रयत्नापूर्वी केएमसी पीजी विद्यार्थिनीचा तिच्या आईला फोन
author img

By

Published : Feb 27, 2023, 8:18 PM IST

वारंगलमधील मेडिकलच्या विद्यार्थीनीचा उपचारादरम्यान मृत्यू

हैदराबाद: तेलंगणात दोन विविध घटनांमध्ये उच्च शिक्षित विद्यार्थींनीनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वरिष्ठांच्या छळाला कंटाळून चार दिवसांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न करणारी पीजी मेडिकल विद्यार्थिनी प्रीती हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. निम्समध्ये उपचारादरम्यान त्या विद्यार्थीनीचा मृत्यू झाला आहे. त्या मुलीच्या मृत्यूनंतर विद्यार्थी संघटना आणि विरोधकांनी आंदोलन सुरू केले. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी त्या संघटनांनी मागणी केली आहे. तर दुसरीकडे वारंगलमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थीनीने देखील आत्महत्या केली आहे.

विद्यार्थीनीचा मृत्यू: या महिन्याच्या 22 तारखेला वारंगळ एमजीएम येथील ज्येष्ठ विद्यार्थिनीच्या छळामुळे दुखावलेल्या प्रीतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, ही घटना घडली असताना सहकारी विद्यार्थ्यांनी तिला पाहिले होते. यानंतर विद्यार्थ्यांनी ताबडतोब तिला एमजीएममध्ये उपचारासाठी दाखल केले. उपचार दरम्यान त्या विद्यार्थीची प्रकृती चिंताजनक होती. त्यानंतर संध्याकाळी त्या विद्यार्थ्यांनीला हैदराबाद येथील निम्समध्ये दाखल करण्यात आले. 22 फेब्रुवारीपासून उपचार घेत असलेल्या या वैद्यकीय विद्यार्थ्याचा रविवारी मृत्यू झाला.

झुंज ठरली अपयशी: गेल्या चार दिवसांपासून एनआयएमएस येथील एआरसीयूमधील विशेष वैद्यकीय पथकाने व्हेंटिलेटर आणि एसीएमओ मशीनच्या मदतीने प्रीतीवर उपचार सुरू होते. तिची तब्येत सुधारण्यासाठी डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले पण त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. एकदा वारंगलच्या एमजीएममध्ये आणि नंतर हैदराबादच्या निम्समध्ये दाखल केल्यानंतर पाच वेळा हृदयाचे ठोके बंद झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. विशेष वैद्यकीय पथकाने सर्वतोपरी प्रयत्न केले पण विद्यार्थिनी प्रितीच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. जीवनाशी लढा देणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यानीचा रविवारी मृत्यू झाला. यामुळे कुटुंबीय व नातेवाईकांवर शोककळा पसरली आहे.

पाच कोटींची मागणी: पोलिसांनी या घटनेचा तपासाला सुरूवात केली आहे. विद्यार्थिनी प्रीतीच्या मृत्यूमागे कारणीभूत असलेल्या वरिष्ठ विद्यार्थी सैफला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली असून त्याला कोठडीत पाठवले आहे. वैद्यकीय विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे विरोधी पक्ष, आदिवासी गट आणि विद्यार्थी संघटना सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. विद्यार्थी संघटनांनी निम्ससमोर निदर्शने केली आहेत. वारंगलमधील काकतिया मेडिकल कॉलेज आणि एमजीएमसमोर विद्यार्थी संघटनांनी जोरदार निदर्शने केली. त्यांनी पीडितेच्या कुटुंबासाठी सरकारकडे 5 कोटी रुपयांची मागणी केली आहे. मुख्याध्यापक आणि विभागप्रमुखांवर गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी संघटनांनी केली आहे.

अभियांत्रिकीच्या विद्यार्थीनीची आत्महत्या: तेलंगणातील वारंगल येथील एका अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्यीनीच्या पुरुष मित्राने तिचे वैयक्तिक फोटो इतरांसोबत शेअर केले आहेत. यामुळे तिने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.

काय आहे प्रकरण: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभियांत्रिकी विद्यार्थीनीची पदवीधर विद्यार्थ्याशी मैत्री होती. विद्यार्थ्याला ही विद्यार्थिनी आवडली आणि तो तिच्या प्रेमात पडला. मात्र नंतर या विद्यार्थ्याची दुसऱ्या इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यीनीशी मैत्री झाली. या प्रकरणावरून मुलगी आणि तिच्या मित्रामध्ये मतभेद झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या विद्यार्थीनीच्या मित्राने कथितरित्या तिची काही वैयक्तिक छायाचित्रे त्याच्या इतर मित्रांसह शेअर केली. यामुळे पीडित विद्यार्थिनी अस्वस्थ झाली आणि त्यामुळेच रविवारी सायंकाळी विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन विद्यार्थिनींच्या छेडछाडीमुळेच आपल्या मुलीने एवढे कठोर पाऊल उचलल्याचा आरोप, मृत विद्यार्थिनीच्या पालकांनी केला आहे. पोलिसांच्या तक्रारीनंतर आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

हेही वाचा : Hyderabad Murder Case : मित्राच्या गर्लफ्रेंडवर करायचा प्रेम अन् मित्रानेच केला त्याचा गेम; मृतदेहासोबत घेतला सेल्फी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.