श्रीनगर- मोहरमनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे फोटो काढणाऱया माध्यम प्रतिनिधींवर श्रीनगर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. ही घटना श्रीनगरमधील जहांगीर चौकात घडली आहे. पोलिसांनी लाठीचार्च केल्याने अनेक पत्रकार व छायाचित्रकार जखमी झाले आहेत. तर काही छायाचित्रकारांच्या कॅमेराचे नुकसानही झाली आहे.
एका माध्यमाचे पत्रकार वसीम अनद्राबी म्हणाले, की आम्ही नेहमीप्रमाणे व्यावसायिक कर्तव्य बजावित होते. तेव्हा शेर घडी पोलिसांनी अनेक पत्रकारांना विनाकारण मारहाण केली. तसेच पत्रकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही कर्तव्य बजावित होतो, हा गुन्हा नाही.
हेही वाचा-जम्मू काश्मीरमध्ये भाजपचे नेते जावेद अहमद दर यांची हत्या
यापूर्वी जम्मू आणि काश्मीर पोलीस प्रशासनाने अलम शरीफ मिरवणुकीवर बंदी घातली होती. मात्र, अनेक तरुणांनी जहांगीर चौकात मिरवणुकीत सहभाग घेतला. त्यावेळी पोलिसांनी तरुणांचा प्रयत्न हाणून पाडला. पोलिसांनी अनेक तरुणांना अटकदेखील केली होती.
हेही वाचा-टीसीएसच्या शेअरच्या किमतीने गाठला आजवरचा उच्चांक, एम-कॅप 13 लाख कोटींवर!
भाजप नेत्याची हत्या
दरम्यान, भाजपचे नेते जावेद अहमद दर यांची मंगळवारी दक्षिण काश्मीरमधील कुलगाम परिसरात हत्या झाली आहे. ही हत्या दहशतवाद्यांनी केल्याचा संशय आहे. जावेद अहमद दर हे शालीभाग विधानसभा मतदारसंघातील भाजपचे प्रभारी होते.