गुवाहाटी: महाराष्ट्रातील 20 हून अधिक बंडखोर आमदार एकनाथ शिंदे ( Rebel Eknath Shinde )यांच्या नेतृत्वाखाली राजधानी गुवाहाटीमध्ये तळ ठोकून आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय घडोमोडीकडे सर्वांते लक्ष लागले आहे. महाराष्ट्रातील 20 हून अधिक बंडखोर आमदार गेल्या आठवडाभरापासून गुवाहाटी येथील आलिशान रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत.गुवाहाटी रस्त्यावर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोरांचे स्वागत करणाऱ्या होर्डिंगने महाराष्ट्राच्या राजकीय गेम प्लॅनची संपूर्ण कहाणी मोडीत ( Maharashtra Political crisis ) काढली आहे.
विशेष म्हणजे गुवाहाटी शहरातील रॅडिसियन ब्लू हॉटेलजवळ ( Radisson Blu Hotel in Guwahati ) गुवाहाटी शहरातील लोकांनी एक मोठे होर्डिंग पाहिले जेथे शिवसेना बंडखोर नेत्यांचे स्वागत करत आहेत. या होर्डिंगवर बाळासाहेब ठाकरे, एकनाथ शिंदे आणि दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांची फोटो लावण्यात आले असून त्यावर 'मिस्टर शिंदे, आम्ही तुमच्यासोबत आहोत' असे लिहिले आहे. विशेष म्हणजे होर्डिंग टांगलेल्या व्यक्ती किंवा संस्थेचा उल्लेख नसला तरी, होर्डिंगच्या खाली असलेले दोन फोटो आसाममध्ये रिपब्लिकन पक्ष चालवणारे श्री शिव नारायण आणि बाला मुक्तियार यांचे आहेत.
हॉटेल रॅडिसन ब्लूसमोर आसाम प्रदेश काँग्रेस आणि इतर पक्षांच्या निदर्शनांदरम्यान, जेथे 22 जूनपासून शिवसेनेचे 39 आमदार आणि इतर नऊ आमदार तळ ठोकून आहेत, आज सकाळपासून शहरातील रस्त्यावरील होर्डिंग्जने ( Hoardings in support of Eknath Shinde ) सर्वांचे लक्ष वेधले आहे.
हेही वाचा -संजय राऊत यांच्या सांगण्यावरून गुंडगिरी, देवेंद्र फडणवीसांचे सरकार झाले पाहिजे - रामदास आठवले