ETV Bharat / bharat

Fierce Fire In Noida : नोएडाच्या रबर कारखान्याला भीषण आग; आगीचे कारण अस्पष्ट

author img

By

Published : Oct 8, 2022, 9:46 AM IST

नोएडा येथील रबर निर्मिती कारखान्यात ( Noida Rubber Factory ) भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या सुमारे 12 गाड्या आग विझवण्यात गुंतल्या आहेत. ( Fierce Fire In Noida )

Fierce Fire In Noida
नोएडाच्या रबर कारखान्याला भीषण आग

नवी दिल्ली : नोएडातील सेक्टर 63 पोलीस स्टेशन परिसरातील सी-320 येथील रबर कारखान्यात ( Noida Rubber Factory ) भीषण आग लागली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या सुमारे 12 गाड्या दाखल झाल्या आहेत. सध्या कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. तर आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सध्या अग्निशमन दलाच्या 12 गाड्यांनी अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली आहे. ( Fierce Fire In Noida )

अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल : त्याचवेळी, शुक्रवारी दुपारी नोएडातील सेक्टर-3 येथील सी-14 येथील एका कारखान्यात भीषण आग लागली. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवली. प्राथमिक माहितीनुसार आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी नोएडाचे मुख्य अग्निशमन अधिकारी अरुण कुमार सिंह यांनी सांगितले की, या कारखान्यात प्लास्टिकचे ट्रे बनवले जात होते, ज्याचा वापर स्वयंपाकघरात केला जातो.

कोणतीही जीवितहानी नाही : कारखान्यातील कामगारांना वेळीच बाहेर काढण्यात आले. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या सुमारे १५ गाड्या हजर होत्या, त्यांनी अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. आग आटोक्यात आणण्यासाठी डीआयजी कायदा व सुव्यवस्था तसेच अनेक पोलिस ठाण्यांचा फौजफाटा घटनास्थळी तैनात करण्यात आला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.