ETV Bharat / bharat

Elon Musk Ultimatum: नियमाचे पालन करा, अन्यथा राजीनामा द्या; मस्क यांचा ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना ई मेल

Elon Musk Ultimatum:ट्विटरवरील आणखी एका गोंधळात, शेकडो कर्मचार्‍यांनी एलोन मस्कने त्यांच्या अत्यंत कट्टर कामाच्या पद्धतीशी सहमत होण्यासाठी किंवा कंपनी सोडण्यासाठी दिलेल्या मुदतीपूर्वी राजीनामा दिला आहे. मस्क यांचा ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना ई मेल.

Elon Musk Ultimatum
Elon Musk Ultimatum
author img

By

Published : Nov 18, 2022, 10:23 AM IST

सॅन फ्रान्सिस्को: ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क ( Elon Musk ) यांनी बहुतेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्यावर ट्विटरचे काहील कर्मचारी राजीनामा देत आहेत. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिल्याने ट्विटरची कार्यालये बंद ठेवण्यात आली आहे. राजीनाम्याच्या या कारणानंतर मस्क यांनी ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम दिला आहे. कर्मचाऱ्यांना आता ठरवायचं आहे की, त्यांना कंपनीसाठी अत्यंत खडतर परिश्रम करत काम करायचं आहे. राजीनामा द्यायचा आहे.

मस्क यांनी कर्मचाऱ्यांना ईमेलद्वारे नव्याने जारी केलेल्या प्रतिज्ञापत्रावर त्यांची सहमती दर्शवण्यास सांगितली आहे. गुरुवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ( 5 pm ET ) कर्मचाऱ्यांना आपली प्रतिक्रिया नोंदवण्यास सांगण्यात आली. बुधवारी एलॉन मस्क यांनी दिलेल्या अल्टिमेटमनंतर ट्विटर कार्यालये बंद होत आहेत. आणि कर्मचारी मोठ्या संख्येने निघून जाणार आहेत. मस्क यांनी ट्विटरच्या कर्मचार्‍यांना कंपनीत अत्यंत कठोर नियमांचे पालन करण्यास सांगितले जात आहे. ज्यात कामाचे तास काही असतील.

या कर्मचाऱ्यांना हे मंजूर नसेल तर कर्मचारी राजीनामा देऊ शकतात. मस्क यांनी या नव्या प्रतिज्ञापत्रावर गुरुवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत कर्मचाऱ्यांना स्वाक्षरी करण्यास सांगितली आहे. या प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरूनव काढले जाणार आहे. त्यांना 3 महिन्यांचा पगार कंपनीकडून देण्यात येईल, अशी माहिती वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार समोर येत आहे. बुधवारी ट्विटर कर्मचाऱ्यांना मस्क यांनी ईमेल पाठवला होता.

ईमेलमध्ये सांगण्यात आले आहे की, पुढे जाण्यासाठी, एक यशस्वी ट्विटर 2.0 तयार करण्यासाठी आणि वाढत्या स्पर्धात्मक जगात यशस्वी होण्याकरिता, आम्हाला अत्यंत स्पर्धात्मक असणे आवश्यक राहणार आहे. या ईमेलमध्ये कर्मचाऱ्यांना 'हो' किंवा 'नाही' या पर्यायाची निवड करण्यास सांगण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांनी हो असं उत्तर दिलेलं नाही. या कर्मचाऱ्यांचा राजीनामा मंजूर करत कंपनी त्यांना 3 महिन्याचा पगार देईल, असंही ईमेलमध्ये सांगण्यात आले आहे. या अल्टिमेटम आधी आणि नंतर ट्विटरच्या शेकडो कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिले. यानंतर ट्विटर कंपनीने ईमेलद्वारे घोषणा केली की, कंपनीच्या कार्यालयीन इमारती सोमवारपर्यंत बंद ठेवण्यात येतील. सोमवारपर्यंत ट्विटर कंपनी राजीनामा दिलेल्या कर्मचारी इमारतीतील प्रवेशासाठी असलेल्या बॅजची परवानगी काढून टाकणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.