हैदराबाद : Margashirsha Guruwar 2023 कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो. हिंदू दिनदर्शिकेनुसार हा नववा महिना आहे. ज्याप्रमाणे श्रावण महिन्यात भगवान शिवाचे महत्त्व आहे, कार्तिक महिन्यात भगवान विष्णूला महत्त्व आहे, त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यात भगवान श्रीकृष्णाला महत्त्व आहे. याशिवाय मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी उपवास करण्याचेही विशेष महत्त्व आहे. चला जाणून घेऊया मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व, मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची तिथी आणि उपासना पद्धती.
गुरुवारचे व्रत महाराष्ट्राच्या अनेक भागात पाळलं जातं : हिंदू कॅलेंडरप्रमाणं नवव्या म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यात देवी महालक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा करणं खूप शुभ मानलं जातं. या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी उपवास केला जातो. यासोबतच ऐश्वर्य आणि समृद्धीची देवी महालक्ष्मीची पूजा केली जाते. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत महाराष्ट्राच्या अनेक भागात पाळलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचं पालन केल्यानं भक्तांना लक्ष्मी देवीची कृपा यासोबतच ऐश्वर्य, यश आणि समृद्धी प्राप्त होते. तसेच जीवनातील सर्व समस्या दूर होऊन जीवन संपत्ती आणि समृद्धीनं सुखी होतं. यावर्षी मार्गशीर्ष महिना अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच बुधवार 13 डिसेंबरपासून सुरू झाला आहे. पहिला गुरुवार 14 डिसेंबर, दुसरा गुरुवार 21 डिसेंबर, तिसरा गुरुवार 28 डिसेंबर, चौथा गुरुवार 4 जानेवारी आणि पाचवा 11 जानेवारी आहे.
मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व : प्राचीन धार्मिक ग्रंथांनुसार मार्गशीर्ष महिन्याला धार्मिक कार्यांसाठी विशेष महत्त्व दिलं जातं, त्यामुळं हा महिना शुभ मानला जातो. या महिन्यापासून सत्ययुग सुरू झाल्याचं सांगितलं जातं. त्यामुळं या महिन्यात पूजेसारखे शुभ कार्य अधिक फलदायी ठरतात. मार्गशीर्ष गुरुवारचा व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळला जातो. असे म्हणतात की मार्गशीर्ष गुरुवारी व्रत करून लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्यानं भक्तांना लक्ष्मी-नारायणाची कृपा प्राप्त होते. देवी लक्ष्मीच्या कृपेनं सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होतं. लक्ष्मी-नारायणाचा आशीर्वाद घेण्यासाठी नवविवाहित जोडपेही या दिवशी उपवास करतात.
चला जाणून घेऊया गुरुवारची महालक्ष्मी व्रत पूजा पद्धत:
- सकाळी उठल्यानंतर प्रथम सर्व कामे उरकून आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला.
- श्रीगणेश आणि माता लक्ष्मीचे ध्यान करून व्रत व उपासनेचा संकल्प करा. पाटावर स्वच्छ लाल किंवा पिवळे कापड पसरून त्यावर लक्ष्मीची मूर्ती स्थापित करा.
- कलशात पाणी भरून त्यात सुपारी, दुर्वा, अक्षता आणि नाणे टाका.
- कलशावर विड्या, आंबा किंवा अशोकाची पाच पाने ठेवून त्यावर नारळ ठेवा.
- टावर थोडे तांदूळ पसरवून त्यावर कलश बसवा.
- हळद-कुंकू हार आणि फुले अर्पण करून कलशाची पूजा करा.
- देवीच्या मूर्तीला हळद आणि कुंकू लावून सजवावे.
- फुले, हार, अगरबत्ती आणि मिठाई अर्पण करून लक्ष्मीची पूजा करा.
- लक्ष्मीला प्रसाद म्हणून फळे आणि मिठाई अर्पण करा.
- व्रताच्या दिवशी महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी किंवा ऐकावी. लक्ष्मी देवीच्या मंत्रांचा जप करा.
- व्रत संपल्यानंतर देवी लक्ष्मीची आरती करून सर्वांना प्रसाद वाटप करा.
हेही वाचा :