ETV Bharat / bharat

हिमाचल प्रदेशमध्ये भूस्खलन; 9 पर्यटकांचा मृत्यू, तीन जण जखमी - हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेशमधील किन्नौर जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनात 9 पर्यटकांचा मृत्यू झाला असून तीन गंभीररित्या जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत बटसेरी गावाला जोडणारा पुलही तुटला आहे. दरम्यान डोंगरावरून अजूनही दगड कोसळत आहेत. रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये भूस्खलन
landslide himachal pradesh
author img

By

Published : Jul 25, 2021, 4:44 PM IST

Updated : Jul 25, 2021, 5:35 PM IST

किन्नोर (हिमाचल प्रदेश) - हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यात भूस्खलन झाले आहे. या अपघातात 9 लोकांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. या घटनेत बटसेरी गावाला जोडणारा पुलही नुकसानग्रस्त झाला आहे. त्याचबरोबर रस्त्यावरील अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मृतांची संख्या व नुकसानीचा आकडा वाढू शकतो.

हिमाचल प्रदेशमध्ये भूस्खलन

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बटसेरीच्या डोंगरावरून अजुनही दगड-गोटे खाली कोसळत आहेत. या दुर्घटनेत नऊ लोकांचा मृत्यू झाल्याची व तीन जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळावर मदत व बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

शनिवारी झालेल्या भूस्खलनात सफरचंदच्या बागांचे व परिसराचे मोठे प्रमाणात नुकसान झाले होते. आज पुन्हा त्याच ठिकाणी भूस्खलन झाल्याने जिवीत व वित्त हानीचे मोठे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे आसपासच्या गावाचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.

दरम्यान या अपघातात झालेल्या मृतांमध्ये एक जण महाराष्ट्राचा आहे.

Last Updated : Jul 25, 2021, 5:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.