ETV Bharat / bharat

Kerala Boat Capsizes : केरळमध्ये सहलीची बोट उलटून तब्बल 22 जणांचा बुडून मृत्यू

केरळच्या मल्लपुरम जिल्ह्यात बोट उलटून तब्बल 22 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळावर बचावकार्य सुरू आहे.

Kerala Boat Capsizes
घटनास्थळावर झालेली गर्दी
author img

By

Published : May 8, 2023, 6:44 AM IST

Updated : May 8, 2023, 7:11 AM IST

मलप्पुरम : सहलीसाठी निघालेली बोट उलटून तब्बल 21 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. ही घटना केरळमधील परप्पानगडी चिशुंगल समुद्रकिनाऱ्यावर रविवारी सायंकाळी घडली. समुद्र किनाऱ्यापासून काही अंतरावर हा अपघात घडला. घटनास्थळावर बचावकार्य सुरुच असून मृतांमध्ये मुले आणि महिलांचा समावेश आहे. दरम्यान जखमी नागरिकांवर उपचाराची तात्काळ व्यवस्था करण्याचे निर्देश आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी दिले आहेत.

केरळमध्ये सहलीची बोट उलटून तब्बल 22 जणांचा बुडून मृत्यू

बोटीत होते भरले जास्त प्रवाशी : रविवारी सायंकाळी काही प्रवाशी सहलीसाठी समुद्रकिनारी निघाले होते. यावेळी 15 जणांना बसवणारी बोट तब्बल 30 पेक्षा अधिक प्रवाशांना घेऊन समुद्रात निघाली होती. मात्र जास्त प्रवाशी बसल्याने बोट हेलकावे खाऊन समुद्रात उलटली. बोट उलटल्याची माहिती मिळताच प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. यावेळी स्थानिक नागरिकांनी अनेक पीडितांची सुटका केली. मात्र घटनास्थळावर मोठी गर्दी झाल्याने मदतकार्यात अडथळे येत आहेत.

गर्दीमुळे बचावकार्यात अडथळा : जखमींना परप्पनगडी, थानूर, तिरूर आणि तिरुरंगडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंचेरी मेडिकल कॉलेज आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जवळपासच्या खासगी रुग्णालयांमध्येही सरकारी डॉक्टरांची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रचंड गर्दी आणि वाहनांमुळे बचावकार्यात अडथळा येत असल्याने अपघातस्थळी न जाता जनतेने सहकार्य करावे, असे पोलिसांनी आवाहन केले आहे. बचाव कार्यासाठी मलप्पुरम आणि कोझिकोड येथून अग्निशमन दलाच्या अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी केला शोक व्यक्त : मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी मलप्पुरमच्या जिल्हाधिकाऱ्यांना अपघातस्थळी आपत्कालीन बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी बचाव कार्यात समन्वय साधण्याची जबाबदारी त्यांचे मुहम्मद रियाझ आणि व्ही अब्दुर रहमान या मंत्र्यांवर सोपवली आहे. मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला आहे.

Royal Family Mussoorie Connection : ब्रिटनच्या राजघराण्याचं मसूरीशी आहे खास नातं, राज्याभिषेकानिमित्त पाठवला खास संदेश

Last Updated : May 8, 2023, 7:11 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.