ETV Bharat / bharat

Pakistan Blast : पाकिस्तानमधील पख्तुनख्वामध्ये बॉम्बस्फोट; 44 ठार, 200 जखमी

पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा येथे झालेल्या बॉम्बस्फोटाच्या ( Bomb blasts in Pakhtunkhwa ) घटनेत आतापर्यंत 44 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. कट्टर इस्लामिक पक्षाच्या मेळाव्यात हा स्फोट झाला. खैबर पख्तुनख्वा प्रांताचे आरोग्य मंत्री रियाझ अन्वर यांनी या घटनेत आतापर्यंत 44 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. तसेच या घटनेत 200 जण जखमी झाले आहेत. ज्यामध्ये 17 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.

Pakistan Blast
Pakistan Blast
author img

By

Published : Jul 30, 2023, 9:31 PM IST

Updated : Jul 30, 2023, 10:55 PM IST

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामध्ये रविवारी मोठा भीषण स्फोट ( Bomb blasts in Pakhtunkhwa ) झाला आहे. या स्फोटात 44 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 200 लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे, हा स्फोट खैबर पख्तूनख्वामधील बाजौर जिल्ह्यातील खार तहसीलमध्ये झाला आहे. जमियत उलेमा इस्लाम-फजल पक्षाची (JUI-F) परिषद सुरू असताना हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या स्फोटात प्राण गमावलेल्यांची संख्या वाढू शकते, असे खैबर पख्तुनख्वा प्रांताचे पोलिस महानिरीक्षक अख्तर हयात गंडापूर यांनी सांगितले आहे.

44 जणांचा मृत्यू 200 जण जखमी : पाकिस्तानी मीडियानुसार जमियत उलेमा इस्लाम फजलचा प्रमुख नेता मौलाना झियाउल्लाह जान यांचाही बॉम्बस्फोटात मृत्यू झाला आहे. खैबर पख्तुनख्वा प्रांताचे पोलिस महानिरीक्षक अख्तर हयात गंडापूर यांनी सांगितले की, जखमींना पेशावर आणि तिमरगेरा येथील रुग्णालयात नेण्यात येत आहे. या घटनेत सुमारे 200 लोक जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरक्षा जवानांनी परिसराची नाकेबंदी केली आहे. बचाव पथकाचे प्रवक्ते बिलाल फैजी यांनी सांगितले की, 5 रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या आहेत.

जखमी रुग्णालयात दाखल : JUI-F चे प्रमुख मौलाना फजलुर रहमान यांच्या पक्षाने जारी केलेल्या निवेदनात या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ, स्थानिक सरकारकडे या हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. रेहमान यांनी जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली. तसेच जेयूआय-एफच्या कार्यकर्त्यांना तातडीने रुग्णालयात पोहोचून रक्तदान करण्याचे आवाहन केले.

मानवतेवर हल्ला : तत्पूर्वी, जेयूआय-एफचे नेते हाफिज हमदुल्ला यांनी सांगितले की, ते आज परिषदेला उपस्थित राहणार होते. परंतु काही वैयक्तिक कारणामुळे ते येऊ शकले नाहीत. ते बोलतांना म्हणाले की, मी या स्फोटाचा तीव्र निषेध करतो. हा जिहाद नसून दहशतवाद आहे. आजची घटना म्हणजे माणुसकीवर हल्ला असल्याचे हाफिज हमदुल्ला म्हणाले.

सरकारकडे स्फोटाच्या चौकशीची मागणी : या स्फोटाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी हमदुल्लाह यांनी केली. तसेच यापूर्वीही JUI-F ला लक्ष्य करण्यात आल्याचे सांगितले. आमच्या कार्यकर्त्यांना टार्गेट केले जात आहे. यावर आम्ही संसदेत आवाज उठवला, पण कारवाई झाली नाही. त्यांनी शोकग्रस्त कुटुंबांप्रती आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची विनंती त्यांनी पाकिस्तान सरकारला केली आहे.

दहशतवादाचे पुनरागमन : जमात-ए-इस्लामीचे सिनेटर मुश्ताक अहमद यांनीही स्फोटाचा निषेध केला. केंद्र सरकार, गुप्तचर संस्था जनतेचे रक्षण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्या आहेत, असे ट्विट त्यांनी केले. दहशतवादाच्या पुनरागमनाने सरकारचे सुरक्षा धोरण अपयशी ठरल्याचे सिद्ध होते. खैबर पख्तुनख्वामधील आदिवासी जिल्हे या आगीच्या विळख्यात आहेत. वाढत्या दहशतवादाच्या मुद्द्यावर संसदेत अधिवेशन बोलवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Last Updated : Jul 30, 2023, 10:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.