अमरावती (आंध्र प्रदेश) : तिरुमाला व्यंकटेश्वर स्वामींच्या दर्शनावरुन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला झालेल्या भीषण अपघातात 7 भाविकांचा मृत्यू झाला. ही घटना वायएसआर जिल्ह्यातील कोंडापूर मंडळाच्या एटरु गावाजवळ घडली. हे भाविक दर्शनानंतर आपल्या गावी परत जात होते. मात्र कोंडापूर परिसरातील एटरू गावाजवळ तुफानच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे.
तिरुमाला दर्शनासाठी आले होते भाविक : आंध्र प्रदेशच्या अनंतपूर जिल्ह्यातील ताडीपात्री आणि कर्नाटकातील बल्लारी येथील 14 नातेवाईक तुफान वाहनातून तिरुमाला व्यंकटेश्वर स्वामींच्या दर्शनासाठी आले होते. दर्शनानंतर ते त्याच वाहनाने आपापल्या घराकडे निघाले होते. या भाविकांनी तिरुमाला येथे बालाजीचे दर्शन घेतले होते. दर्शन झाल्यानंतर हे नातेवाईक आलेल्या वाहनातून घरी परत जात होते. मात्र वायएसआर जिल्ह्यातील कोंडापूरजवळ कडप्पा-ताडीपत्री मुख्य रस्त्यावर ही घटना घडल्याने सगळे होत्याचे नव्हते झाले.
कसा झाला अपघात : भाविकांच्या तुफान वाहनाने प्रवासाचा अर्धा पल्ला गाठला होता. मात्र सुसाट जाणाऱ्या या वाहनाच्या चालकाचा वायएसआर जिल्ह्यातील कोंडापूर मंडळाच्या एटरु गावाजवळ कडप्पा-ताडीपत्री मुख्य रस्त्यावर गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे तुफान गाडी विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका लॉरीला धडकली. या अपघातात सातही जण जागीच ठार झाले. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी जखमींना तात्काळ १०८ वाहनातून ताडीपत्री शासकीय रुग्णालयात हलवले.
पोलिसांनी घेतली घटनास्थळी धाव : भाविकांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमी भाविकांना ताडीपत्री रुग्णालयात हलवले. पोलीस निरीक्षक सुदर्शन प्रसाद यांच्यासह एसएस सत्यनारायण यांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा आढावा घेत वाहतूक सुरळीत केली.
हेही वाचा -