पणजी - पणजी मतदारसंघातून मी (Utpal Parrikar Contest Panaji Constituency )अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी घोषणा केली आहे.
पणजीऐवजी बिचोलीतून उमेदवारी घ्यावी हा भाजपचा प्रस्ताव उत्पल पर्रिकर यांनी नाकारला असून आता ते पणजीतून अपक्ष निवडणूक (Utpal Parrikar Contest Panaji Constituency ) लढणार आहेत. तशा प्रकारची घोषणा त्यांनी केली आहे. उत्पल पर्रिकरांचा हा निर्णय भाजपसाठी मोठा धक्का असल्याचे सांगण्यात येतंय. उत्पल पर्रिकर हे भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांचे पुत्र आहेत.
भाजपक़डून गोव्यासाठी 34 उमेदवारांची (Goa Assembly elections) पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपच्या या यादीत पणजीतून उत्पल पर्रिकर यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्याऐवजी त्यांना बिचोलीतून निवडणूक लढवण्याचा पर्याय देण्यात आला होता. त्यामुळे उत्पल पर्रिकरांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला.
माझी भूमिका ठाम आहे. मी पणजीतूनच लढणार. दुसऱ्या जागेवरुन लढण्याचा कुठलाही विचार नाही, असे म्हणत पर्रिकर यांनी भापजविरोधात शड्डू ठोकला आहे.
-
I will be contesting as an Independent candidate from Panaji constituency: Utpal Parrikar, son of late former CM Manohar Parrikar#GoaElections pic.twitter.com/FsBomEeRwk
— ANI (@ANI) January 21, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">I will be contesting as an Independent candidate from Panaji constituency: Utpal Parrikar, son of late former CM Manohar Parrikar#GoaElections pic.twitter.com/FsBomEeRwk
— ANI (@ANI) January 21, 2022I will be contesting as an Independent candidate from Panaji constituency: Utpal Parrikar, son of late former CM Manohar Parrikar#GoaElections pic.twitter.com/FsBomEeRwk
— ANI (@ANI) January 21, 2022
माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर ( Former Goa CM Manohar Parrikar ) यांचा मुलगा उत्पल पर्रिकर ( Utpal Parrikar ) यांच्या उमेदवारीवरून राज्यात जोरदार चर्चा होत्या. उत्पल पर्रिकर यांच्याविरोधात एकही उमेदवार देऊ नका, असे ट्विट शिवसेना खासदार संजय राऊत ( Shivsena MP Sanjay Raut Tweet on Utpal Parrikar ) यांनी केले होते. त्याची जाेरदार चर्चा राज्यात हाेती.
उत्पलच्या समर्थनार्थ संजय राऊत यांनी भाजप विरोधातील सर्व पक्षांना उत्पल यांच्याविरोधात उमेदवारी न देण्याचे आवाहन केले होते. राऊत यांनी उत्पल यांना शिवसेनेत प्रवेश करण्याचे आवाहनही केले होते. आम आदमी पक्षाचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही उत्पल यांना आपमध्ये प्रवेश करण्याची ऑफर दिली होती.
उत्पल पर्रिकर याने आम आदमी पक्षात प्रवेश केला तर त्याच्यासाठी मी माझी उमेदवारी त्याला देईन व उत्पल साठी काम करणार असल्याचे आम आदमी पक्षाचे पणजीचे उमेदवार वाल्मिकी नाईक यांनी म्हटले होते. वाल्मिकी यांना आपने नुकतीच पणजी मतदारसंघातून उमेदवारी निश्चित केली आहे.
काय होता पर्रिकरांच्या उमेदवारीचा वाद -
केवळ पर्रिकरांचे पुत्र म्हणून उमेदवारी देता येणार नाही, असे विधान भाजपचे गाेवा विधानसभा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. त्यानंतर त्यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये मोठा पेच निर्माण झाला होता. विधानसभा निवडणूक लढवणारच असा निर्धार उत्पल यांनी केला असून पणजी मतदारसंघात प्रचारास सुरुवातही केली होती. पणजीतून उत्पल सोबत स्थानिक आमदार बाबुश मोंसरात भाजपकडून निवडणूक लढविणार आहेत. बाबुश मोंसरात यांचे तिसवादी तालुक्यातील पाचही मतदारसंघात समर्थक आमदार आहेत. जर मोंसरात यांना तिकीट नाकारल्यास त्याचा फटका भाजपला बसू शकतो, म्हणूनच भाजपने आधीच सावध पवित्रा घेत मोंसरात यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.