ETV Bharat / bharat

Goa Assembly Election 2022 : मनोहर पर्रीकर गोवा विकासाचे शिल्पकार - अमित शहा

गोव्यात विधानसभा निवडणुकीची ( Goa Assembly Election 2022 ) रणधुमाळी सुरु झाली असून भाजपाच्या प्रचारासाठी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मैदानात उतरले आहेत. रविवारी दुपारी दोन वाजता ( Amil Shah Goa Tour ) त्यांचे गोव्यात आगमन झाले.

author img

By

Published : Jan 31, 2022, 3:26 AM IST

Updated : Jan 31, 2022, 4:32 AM IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

गोवा (पणजी) - माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे देशाचे आणि गोव्याचे भूषण होते. त्यांनी संपुर्ण गोव्याचा विकास केला असल्याचे गौरवोद्गार देशाचे केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी काढले आहे. शहा रविवारी (दि. 30 जानेवारी)रोजी निवडणूक प्रचारासाठी गोव्यात दाखल झाले आहेत. (Goa Assembly Election 2022) यावेळी त्यांनी दक्षिण गोव्यात विविध ठिकाणी प्रचारसभा घेऊन कार्यकर्त्यांना गोवा जिंकण्यासाठी शहा यांनी प्रोत्साहन दिले.

कार्यक्रमात बोलताना केंद्रिय गृहमंत्री अमित शहा

काँग्रेस सरकारच्या काळात गोव्यात अराजकता- शाह

जेव्हा काँग्रेस सरकार होते तेव्हा दिगंबर कामत मुख्यमंत्री होते. (Amit Shah visit to Goa) त्यावेळी राज्यात अस्थिरता, अराजकता आणि अव्यवस्था होती. मात्र, भाजप सरकार अस्तित्वात आल्यानंतर राज्याचा विकास झाला आणि या विकासाचे शिल्पकार स्वर्गीय मनोहर पर्रीकर असल्याचे शाह यांनी सांगितले.

भाजपचे सरकार येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला

शाह यांनी रविवारी दक्षिण गोव्यात अनेक ठिकाणी प्रचार सभा घेतल्या आहेत. याचे थेट प्रक्षेपण डिजिटल माध्यमातून संपूर्ण राज्यात करण्यात आले होते. कोरोना नियमांचे पालन करून अनेक ठिकाणी शाह यांनी भेटी देऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत पुन्हा एकदा राज्यात डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

विरोधी पक्ष फक्त टूरिझम साठी गोव्यात

राज्यात निवडणुकीसाठी दाखल झालेल्या आप आणि तृणमूल काँग्रेस पक्षासाठी गोवा केवळ टूरिस्ट डेस्टिनेशन झाले आहे. हे राजकीय पक्ष केवळ राजकीय पर्यटकांसाठी गोव्यात आले आहेत. निवडणूक झाली की आपल्या गाशा गुंडाळून पुन्हा माघारी परतणार असल्याचेही शहा म्हणाले. मात्र, भाजपा हा गोव्यासाठी आणि गोवेकारांसाठी आहे म्हणून मोदींनी गोव्याच्या अंदाजपत्रकात तब्बल 2567 कोटी रुपये मंजूर केले. मात्र, काँग्रेस सरकारच्या काळात ही रक्कम फक्त 432 कोटी होती अशी माहिती शाह यांनी आपल्या भाषणात दिली आहे.

हेही वाचा - Amit Shah in Goa : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गोव्यात दाखल, भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी घेणार तीन सभा

Last Updated : Jan 31, 2022, 4:32 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.