ETV Bharat / bharat

मन की बात : जल म्हणजे जीवन, आस्था आणि विकासाची धार - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदींनी जागतिक जल दिनावर भाष्य केले. जल म्हणजे जीवन आहे. आस्था आणि विकासाची धार आहे, असे ते म्हणाले. या कार्यक्रम मालिकेचा हा 74 वा भाग होता.

author img

By

Published : Feb 28, 2021, 1:26 PM IST

मन की बात
मन की बात

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. या कार्यक्रम मालिकेचा हा 74 वा भाग होता. यावेळी आत्मनिर्भर भारत, जागतिक जल दिन, राष्ट्रीय विज्ञान दिवस वर भाष्य केले. जलशक्ती मंत्रालयाच्यावतीनं जल शक्ती अभियान म्हणजेच ‘कॅच द रेन’ सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे -

पंतप्रधान मोदींनी जागतिक जल दिनावर भाष्य केले. जल म्हणजे जीवन आहे. आस्था आणि विकासाची धार आहे. लोखंडाला जर परिसाच्या स्पर्श झाला, तर त्याचं सोन्यामध्ये रूपांतर होतं असं म्हणतात. त्याचप्रमाणं पाण्याचा स्पर्श जीवनासाठी जरूरीचा आहे. विकासासाठीही पाण्याची गरज आहे. आता उन्हाळा सुरू होत आहे. त्यामुळे पाण्याच्या बचतीसाठी आपण आत्तापासूनच प्रयत्न सुरू केले पाहिजेत. येत्या 22 मार्च या तारखेला ‘जागतिक जल दिन’ येत आहे.

जलशक्ती मंत्रालयाच्यावतीनं जल शक्ती अभियान म्हणजेच ‘कॅच द रेन’ सुरू केलं जाणार आहे. याचा मूलमंत्र आहे, - ‘‘कॅच द रेन, व्हेअर इट फॉल्स, व्हेन इट फॉल्स’’. यासाठी आपण आत्तापासूनच काम सुरू करूया. आापल्याकडे आधीपासूनच रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम आहेत, त्यांची दुरूस्ती करून घ्यायची आहे. गावांची, तलावांची स्वच्छता करून घेवू.

‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ आज देशभरात साजरा केला जात आहे. आजचा दिवस हा भारताचे महान वैज्ञानिक, डॉक्टर सी.व्ही. रमण यांनी शोधून काढलेल्या ‘रमण इफेक्ट’ला समर्पित आहे. आत्मनिर्भर भारत अभियानात विज्ञानाच्या शक्तीचे खूप जास्त योगदान आहे. आपण विज्ञानाला ‘लॅब टू लँड’ म्हणजेच ‘प्रयोगशाळेपासून ते भूमीपर्यंत’ असा मंत्र मानून पुढं गेलं पाहिजे.

जेव्हा प्रत्येक नागरिक आपल्या जीवनात विज्ञानाचा विस्तार करेल, प्रत्येक क्षेत्रात विज्ञान येईल, तेव्हा प्रगतीचे मार्गही मुक्त होतील आणि देश आत्मनिर्भर बनेल. देशाचा प्रत्येक नागरिक अशा अनेक गोष्टी करू शकतो, असा मला विश्वास आहे.

आपल्या देशाच्या वस्तूंविषयी, मालाविषयी अभिमान बाळगणे ही, आत्मनिर्भरतेची पहिली अट आहे. आपल्या देशातल्या लोकांनी बनविलेल्या वस्तूंचा अभिमान प्रत्येक देशवासीयाला वाटला पाहिजे. त्या दिवशी त्या वस्तूशी लोक जोडले जातील आणि आत्मनिर्भर भारत बनेल. देशामध्ये बनवलेल्या तेजस लढाऊ विमानांची उत्तुंग भरारी पाहतो. तेव्हा आपल्याला गौरव वाटतो. आत्मनिर्भर भारताचा हा मंत्र, देशातल्या गावां-गावांमध्ये पोहोचतोय, याचा मला आनंद होत आहे.

तुम्ही कर्तव्याच्या मार्गावर ठाम राहाल. तेव्हाच देश वेगाने पुढे मार्गक्रमण करत राहील. तुम्ही सर्वांनी कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करण्यात कोणताही हलगर्जीपणा करू नका, असेही मोदी म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.