ETV Bharat / bharat

Manipur Violence : मणिपुरात पुन्हा हिंसाचार, तिघांची गोळ्या झाडून हत्या केल्यानं तणावाची स्थिती - इम्फाळ खोरे

Manipur Violence : आज सकाळी अज्ञात व्यक्तींनी माणिपुरमधील इरेंग आणि करम वायफेई दरम्यानच्या भागात अज्ञातांनी तीन नागरिकांची गोळ्या झाडून हत्या केली, असं अधिकाऱ्यानं सांगितलंय.

माणिपुरात पुन्हा हिंसाचार
Manipur Violence
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 12, 2023, 4:21 PM IST

Updated : Sep 12, 2023, 6:03 PM IST

इंफाळ Manipur Violence : माणिपुरमधील कांगगुई भागातील इरेंग आणि करम वायफेई गावांदरम्यान हा हल्ला झाल्याचं त्यांनी सांगितलंय. कमिटी ऑन ट्रायबल युनिटी (COTU) या कांगपोकपी-आधारित नागरी समाज संघटनेने या हल्ल्याचा निषेध केलाय. (Three killed in fresh violence in Manipur)

तेंगनौपाल जिल्ह्यात हिंसाचार : केंद्र सरकार माणिपुरात शांतता पुनर्प्रस्थापीत करण्यावरुन गंभीर असेल तर त्यांनी खोऱ्यातील सर्व जिल्ह्यांना अशांत क्षेत्र घोषीत केलं पाहिजे. तसचं या परिसरात सशस्त्र सेना (विशेष अधिकार) कायदा 1958 लागू केला पाहिजे, अशी मागणी कमिटी ऑन ट्रायबल युनिटी (COTU) या संघटनेनं निवेदनातू केलीय. माणिपुरातील तेंगनौपाल जिल्ह्यातही 8 सप्टेंबर रोजी हिंसाचार झाला होता. त्यावेळी तिघांची हत्या झाली होती. तर 50 हून अधिक लोक जखमी झाले होते. (Manipur Violence)

हिंसाचारात आतापर्यंत 160 हुन अधिक बळी : माणिपुरात 3 मे रोजी शेड्यूल्ड ट्राईबचा दर्जा मिळावा या मागणीसाठी मेतेई समुदायाच्या मागणीला विरोध करण्यासाठी डोंगराळ जिल्ह्यांमध्ये 'आदिवासी एकता मार्च' आयोजित करण्यात आला होता. यावरुन माणिपुरात मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु झाला होता. या हिंसाचारात आजपर्यंत 160 हून अधिक जणांचा मृत्यू झाला. मणिपूरच्या लोकसंख्येपैकी 53 टक्के लोकसंख्या मेईटीस असुन ते मुख्यतः इम्फाळ खोऱ्यात राहतात. तर नागा आणि कुकींसह आदिवासी लोकसंख्या 40 टक्के आहे. यातील बहुतेक लोक डोंगराळ जिल्ह्यांमध्ये राहतात. गेल्या काही दिवसांपासून माणिपुरात हिंसाचार सुरू आहे. यावरुन विरोधी पक्षांनी राज्य तसेच केंद्र सरकारला धारेवर धरलंय. तसंच विरोधी पक्षांनी मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची देखील मागणी लावून धरलीय.

हेही वाचा :

  1. Rahul Gandhi : तुम्ही मणिपूरमध्ये का गेला नाहीत? कारण...; राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर जळजळीत टीका
  2. Rahul Gandhi : 'मोदींना मणिपूर जाळायचे आहे, सैन्याने मनात आणले तर..', राहुल गांधींचा गंभीर आरोप
  3. Amit shah : 'मणिपूरमध्ये हिंसा झाली हे मान्य, मात्र विरोधक तर...', अमित शाह लोकसभेत गरजले

Last Updated : Sep 12, 2023, 6:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.