ETV Bharat / bharat

Manipur Violence : स्वातंत्र्यसैनिकाच्या पत्नीला जमावाने जिवंत पेटवले; घरात राहिली फक्त राख, अन् हाडे, नात अन् सुनेने सांगितला घटनेचा थरार

स्वातंत्र्यसैनिकाच्या विधवा पत्नीला घरात बंद करुन समाजकंटकांनी घराला आग लावून दिली. या घटनेत स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नी असलेल्या इबेतोम्बी माईबी यांचा मृत्यू झाला आहे. मात्र या घटनेचा थरारक अनुभव त्यांची सून आणि नातीने कथन केला आहे. इबेतोम्बी माईबी यांच्या बचावासाठी गेलेली त्यांची नात गोळीबारात जखमी झाली आहे.

Manipur Violence
समाजकंटकांनी जाळलेले घर
author img

By

Published : Jul 24, 2023, 7:34 AM IST

Updated : Jul 24, 2023, 7:56 AM IST

इम्फाळ : मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करुन त्यांची धिंड काढल्याने देशभर संताप व्यक्त करण्यात येत असताना आता आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सशस्त्र जमावाने स्वातंत्र्यसैनिकाच्या पत्नीला घरात बंद करुन जीवंत पेटवून दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. यावेळी त्यांना बचावासाठी गेलेल्या नातीवरही समाजकंटकांनी गोळीबार केला. ही घटना 28 मे रोजी सेरो या गावात घडली असून ती आता उघडकीस आली आहे. इबेतोम्बी माईबी असे समाजकंटकांनी जिवंत जाळलेल्या स्वातंत्र्यसैनिकाच्या पत्नीचे नाव आहे. त्यांचे पती चुराचंद सिंग यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वात स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता. दरम्यान या घटनेचा इबेतोम्बी माईबी यांची नात आणि सुनेने थरारक अनुभव कथन केला.

समाजकंटकांनी घरावर केला हल्ला : सेरो गावातील इबेतोम्बी माईबी यांच्या घरावर सशस्त्र जमावाने 28 मे रोजी हल्ला केला होता. यावेळी त्यांच्या घरात त्यांची नात प्रेमकांता, सून तम्पक्षणा यांच्यासह नातेवाईक होते. समाजकंटकांनी सशस्त्र हल्ला केल्यानंतर इबेतोम्बी माईबी यांनी आपल्या नातेवाईकांना घरातून सुरक्षितस्थळी पळून जाण्यास सांगितले. इबेतोम्बी माईबी यांचे वय 80 वर्ष असल्याने त्यांना घरातून पळून जाणे शक्य नसल्याने त्या घरातच पडून होत्या. तुम्ही सुरक्षितस्थळी पोहोचल्यानंतर मग मला वाचवण्यास या, असा निरोप त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना देऊन घरातून काढून दिले होते. मात्र तेच त्यांचे अखेरचे शब्द ठरले.

इबेतोम्बी माईबीची जळालेली हाडे अन् राख उरली मागे : इबेतोम्बी माईबी यांनी त्यांच्या नातेवाईकांना सुरक्षितस्थळी पाठवल्यानंतर सशस्त्र जमावाने त्यांच्या घराला घेरले. यावेळी जमावाने त्यांना घरात बंद करुन घराला आग लावून दिली. या आगीत इबेतोम्बी माईबी यांची फक्त राख अन् हाडेच उरली. घरात स्वातंत्र्यसैनिक असलेले त्यांचे दिवंगत पती एस चुराचंद सिंग यांचे अर्धवट जळाले स्मृतीचिन्ह, अनेक मौल्यवान वस्तू, जळालेले घरगुती साहित्य आणि भिंतीवरील गोळ्यांचे छिद्र एका भयानक घटनेची साक्ष देत आहेत. जेव्हा सशस्त्र हल्लेखोरांनी आमच्या घरावर हल्ला केला, तेव्हा माझ्या सासूने मला आणि इतर शेजाऱ्यांना पळून जाण्यास सांगितले. हल्लेखोर तेथून निघून गेल्यावर परत या किंवा मला सोडवण्यासाठी कोणीतरी पाठवा, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे मी आणि इतर तीन कुटुंबांचे शेजारी पळून आल्याची माहिती इबेतोम्बी माईबी यांची सून एस. तम्पक्षाना यांनी वृत्तसंस्थेला दिली.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या लष्करात सैनिक : चुराचंद सिंग हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या लष्करात सैनिक होते. त्यांना राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते 1997 मध्ये नेताजी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. चुराचंद सिंग यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिले, मात्र त्यांच्या पत्नीला समाजकंटकांनी जाळून ठार केल्याने मोठा संताप व्यक्त करण्यात येत आहे.

वाचवणाऱ्यांवर हल्लेखोरांचा गोळीबार : इबेतोम्बी माईबी यांना घरात बंद करुन हल्लेखोरांनी घराला आग लावली. त्यानंतर इबेतोम्बी माईबी यांची नात प्रेमकांता या त्यांना वाचवण्यासाठी घटनास्थळी आल्या. मात्र त्यांचा बचाव करत असतानाच हल्लेखोरांनी पुन्हा आमच्यावर गोळीबार केल्याची माहिती प्रेमकांता यांनी वृत्तसंस्थेला दिली. या गोळीबारात प्रेमकांता यांना गोळी लागल्याने त्या जखमी झाल्या आहेत. त्यामुळे बचावाला आलेल्या प्रेमकांता आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तेथून पलायन केल्याचे त्यांनी यावेळी वृत्तसंस्थेला सांगितले.

व्यापाऱ्यांनी घेतला मदत छावण्यात आश्रय : मेईतेई समुदायाच्या अनुसूचित जमाती (एसटी) दर्जाच्या मागणीला विरोध करण्यासाठी डोंगरी जिल्ह्यांमध्ये 'आदिवासी एकता मार्च' निघाल्यानंतर हा हिंसाचार सुरू झाला आहे. 80 दिवसांच्या वांशिक हिंसाचारात आतापर्यंत 160 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. विविध समुदायातील 600 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. तर 70 हजारेपक्षा अधिक नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. व्यापारी वसाहत उजाडली असून व्यापाऱ्यांनी मदत छावण्यात आश्रय घेतला आहे.

Last Updated : Jul 24, 2023, 7:56 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.