पणजी: गोवा हे नाव येताच पर्यटन स्थळ, सागरी किनारे, आणि इतर वैशिष्ठ समोर येतात. याच गोव्यात या सोबतच तीर्थक्षेत्रही आहेत. येथील मंगेशी गावात वसलेले हे ठिकाण यात्रेकरु तसेच भाविक भक्तांसाठी महत्वाचे माणले जाते. हे मंदिर गोव्यातील सर्वात श्रीमंत आणि मोठ्या हिंदू मंदिरांपैकी एक असल्याचे माणले जाते. हे मंदिर मंगेशी गावात आहे. भगवान शिव आणि पार्वतीची एक जुनी कथा आहे ज्यामुळे त्याला वेगळे महत्व आहे.
अशी आख्यायिका आहे की एकदा भगवान शिवाने, पत्नी देवी पार्वतीला घाबरवण्यासाठी स्वतः वाघाचे रुप धारण केले. जेव्हा देवी पार्वतीने वाघाला पाहिले तेव्हा ती खूप घाबरली आणि भगवान शिवाच्या शोधात 'त्राहिमम गिरीशा' या नावाने हाक मारली. १५४३ मध्ये पोर्तुगीजांनी आक्रमण केलेल्या रतालिमच्या कुशास्थलीमध्ये या मंदिराच्या इतिहासाचे मूळ आहे अशी मान्यता आहे. 1560 च्या सुमारास, जेव्हा पोर्तुगीजांनी सगळ्यांना ख्रिश्चन धर्म स्विकारण्यासाठी दबाव टाकायला सुरवात केली तेव्हा स्थानिकांनी मंगेश लिंगाला त्याच्या मूळ जागेवरून आगनाशिनी नदीच्या काठावर हलवले जेथे ते सध्या आहे.
या गावात स्थलांतरित झाल्यामुळे मंदिराचे दोनदा नूतनीकरण केले गेले. पहिल्यांदा मराठ्यांच्या कारकिर्दीत आणि दुसऱ्यांदा 1890 च्या काळात आणि अगदी अलीकडे, 1973 मध्ये, या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला तेव्हा मंदिराच्या दर्शनी भागात सोन्याचा कलश स्थापित करण्यात आला.
मंगेशी मंदिरात आवारातील सुंदर पाण्याच्या कारंज्यांनी वेढलेला सात मजली दीपस्तंभ पाहण्यासारखा आहे. हा मंदिराचा सर्वात जुना भाग मानला जातो. दिवे प्रज्वलित केल्यावर पाहण्याचा अनुभव रोमांचकारी मानण्यात येतो.
माता पार्वतीने भोलेनाथांची अशी प्रार्थना केली की भोलेनाथ यांना समोर पाहून माता पार्वतीने त्यांना खास विनंती केली. देवी म्हणाली की, भगवान शिव यांनी त्यांच्या नावांमध्ये 'मम-गिरीशा' समाविष्ट करावे. ज्यामार्फत त्यांना ओळखले जाते व त्यांची पूजा केली जाते. असे म्हटले जाते की, तेव्हापासून या ठिकाणी मम-गिरीशाचे एक लहान रूप 'मांगीरीश' आणि 'मंगेश' या नावाने शिवाची पूजा केली जाते अशीही अख्यायीका सांगितली जाते.