ETV Bharat / bharat

Mortgage for Tomato : टोमॅटोसाठी कायपण; चक्क दोन अल्पवयीन मुलांना दुकानदाराकडे ठेवले गहाण - टोमॅटोसाठी मुलांना गहाण ठेवले

ओडिशाच्या कटकमध्ये एका व्यक्तीने दोन अल्पवयीन मुलांना दोन किलो टोमॅटोसाठी भाजीच्या दुकानात गहाण ठेवले. विशेष म्हणजे, या दोन्ही मुलांना याची थोडीशीही कल्पना नव्हती. दोन तासांनंतर दुकानदाराने मुलांची चौकशी केली असता सत्य समोर आले. वाचा संपूर्ण बातमी... (Mortgage for Tomato)

Tomato
टोमॅटो
author img

By

Published : Jul 30, 2023, 3:49 PM IST

कटक (ओडिशा) : देशभरात टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. टोमॅटोच्या दरात वाढ झाल्यानंतर अनेक विचित्र घटना समोर येत आहेत. कुठे टोमॅटोच्या ट्रकची चोरी होत आहे, तर कुठे टोमॅटोच्या सुरक्षेसाठी चक्क बॉडीगार्ड तैनात केले गेले आहेत. आता ओडिशातील कटकमधून एक ताजी घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने दोन किलो टोमॅटोसाठी दोन अल्पवयीन मुलांना भाजी विक्रेत्याकडे गहाण ठेवले. आश्चर्याचे म्हणजे, भाजी विक्रेत्यानेही दोन्ही मुलांना सुमारे दोन तास ओलीस ठेवले होते. ही घटना संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.

अल्पवयीन मुलांना भाजी विक्रेत्याकडे गहाण ठेवले : ही घटना कटकच्या छत्रबाजार भागात घडली आहे. या अल्पवयीन मुलांनी सांगितले की, त्यांना एका व्यक्तीने भुवनेश्वरहून सामान इतरत्र शिफ्ट करण्यासाठी 300 रुपये देऊन आणले होते. तेथे आल्यावर तो व्यक्ती छतबाजारच्या एका टोमॅटोच्या दुकानात गेला. तेथे त्याने दोन किलो टोमॅटो विकत घेतले. मात्र त्या व्यक्तीने आपण पैसे आणायला विसरलो असे सांगितले. त्यानंतर त्याने काही वेळात पैसे घेऊन येतो असे सांगत या दोन्ही अल्पवयीन मुलांना भाजी विक्रेत्याकडे गहाण म्हणून ठेवले. यानंतर तो व्यक्ती दोन किलो टोमॅटो घेऊन तेथून पळून गेला.

मुले व्यक्तीला ओळखत नाहीत : बराच वेळ ती व्यक्ती न आल्याने दुकानदाराने दोन्ही अल्पवयीन मुलांची चौकशी सुरू केली. चौकशीत त्या दोन मुलांना त्या व्यक्तीचं नावही माहीत नसल्याचं निष्पन्न झालं. 300 रुपये देण्याचे आश्वासन देऊन त्या व्यक्तीने त्यांना सामान उचलण्यासाठी भुवनेश्वरहून आणल्याचे अल्पवयीन मुलांनी सांगितले. ते म्हणाले की, ते त्या व्यक्तीला ओळखत नाहीत आणि या आधी कधी भेटलेही नाहीत. या प्रकरणी दुकानदाराने पोलिस ठाण्यात तक्रार केली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा :

  1. Tomato Theft Kolhapur : आता टोमॅटोही बँक लोकरमध्ये ठेवण्याची आली वेळ; महाग झाल्याने चोरीच्या घटनांमध्ये वाढ
  2. Rich By Selling Tomatoes : हा शेतकरी टोमॅटो विकून झाला मालामाल!..दिवसाचे कमावतो लाखो रुपये
  3. Tomato Theft : पुणे जिल्ह्यात टोमॅटोची चोरी, शेतकऱ्याचे तब्बल 400 किलो टोमॅटो चोरीला!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.