ETV Bharat / bharat

पत्नीला दुसऱ्या पुरूषासोबत पाहून पती भडकला आणि..... - कर्नाटक क्राईम न्यूज

कर्नाटकाच्या चमराजनगरमधील गुंडलुपेटमध्ये पत्नीला दुसऱ्या पुरूषासोबत पाहून पती भडकला आणि त्याने प्रियकराचा खून केल्याची घटना घडली आहे. बसवशेट्टी (वय 28) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर शिवन्ना आरोपीचे नाव आहे.

कर्नाटक
कर्नाटक
author img

By

Published : May 22, 2021, 9:02 PM IST

बंगळुरु - कर्नाटकाच्या चमराजनगरमधील गुंडलुपेटमध्ये हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका तरूणाला निर्दयीपणे मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली आहे. ही घटना प्रेम प्रकरणातून घडल्याचं समजतं. पतीने पत्नीच्या प्रियकराला ठार केले.

बसवशेट्टी (वय 28) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर शिवन्ना आरोपीचे नाव आहे. बसवशेट्टीचे शिवन्नाच्या पत्नीशी विवाहबाह्य संबंध होते. बुधवारी रात्री शिवन्नाने पत्नी आणि तिचा प्रियकर दोघांनाही एकत्र पकडले. रागाच्या भरात शिवन्नाने बसवशेट्टीची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

विवाहबाह्य संबंधामुळे कुटुंब उद्ध्वस्त -

कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये ज्या प्रकारे नागरिकांचे उद्योग धंदे, नोकऱ्या गेल्यात तसेच अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गवर आहे. याचे मुख्य कारण ठरत आहे अनैतिक, विवाहबाह्य संबंध. लॉकडाऊन काळात सगळ्यांच्या मनाविरुद्ध घरात राहणे भाग पडले होते. या काळात कधी नाही इतका वेळ पती-पत्नींनी एकत्र घालवला. कुटूंबासोबत कधी नाही तो इतका वेळ घालवण्याचा अनेकांना फायदा झाला. तर काही कुटुंबात पती-पत्नीचे विवाह बाह्य संबंधाचे बिंग फुटले आणि यातून निर्माण झालेले वाद पोलीस ठाण्यापर्यंत जाऊन घटस्फोटपर्यंत पोहोचले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.