नवी दिल्ली - रिंकू शर्मा हत्याकांडानंतर दिल्लीमध्ये पुन्हा एका तरुणीची हत्या झाली आहे. लग्नाला नकार दिल्याने एका 17 वर्षीय तरुणीचा खून केला आहे. दिल्लीतील बेगमपूरमध्ये ही घटना घडली. लईक असे आरोपीचे नाव असून तो फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तसेच पोलिसांनी पीडित तरुणीच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली आहे.
पीडित तरुणी यापूर्वी आपल्या कुटुंबासोबत बवाना भागात राहत होती. जवळपास एका वर्षापूर्वी तीचे कुटुंब बेगमपूर परिसरात राहायला आले होते. बवाना भागात लईक त्यांचा शेजारी होता. त्यांचे पीडितेच्या कुटुंबासोबत चांगले संबंध होते. त्याने पीडितेला लग्नासाठी प्रपोज केले. मात्र, तीन नकार दिला. यातून त्यांच्या वाद झाला. यातून त्याने पीडितेवर हातोड्याने वार केले. पीडितेच्या भावाने आरोपीविरोधात बेगमपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
रिंकू शर्मा हत्या प्रकरण -
दिल्लीच्या मंगोलपुरी परिसरात हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यकर्ता असलेल्या रिंकू शर्माची 10 फेब्रुवारीला हत्या करण्यात आली होती. रिंकू शर्मा हा बजरंग दल आणि भाजपच्या युवा कार्यकर्ता होता. रिंकू मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेला होता. पार्टीवरून घरी परतल्यानंतर आरोपींनी रिंकूच्या घराबाहेर येऊन शिवागाळ केली. त्यांना हटकल्यानंतर वाद वाढला आणि आरोपींनी चाकूने सपासप वार रिंकूची हत्या केली. यानंतर रिंकूला रुग्णालयात नेले. मात्र, उपचारादरम्यान रिंकूचा मृत्यू झाला.