ETV Bharat / bharat

Railway Job By False Documents : खोटी कागदपत्रे तयार करून मिळवली रेल्वेत नोकरी, तब्बल ३२ वर्षांनंतर प्रकरण उघडकीस!

author img

By

Published : Feb 14, 2023, 9:49 AM IST

आंध्र प्रदेशच्या मंडल चक्रधर याने डिसेंबर 1991 मध्ये खोटे घोषणापत्र व दस्तऐवज सादर करून पश्चिम बंगालमधील वाल्मिकी अनुसूचित समुदायाचे प्रमाणपत्र मिळवले. आता तब्बल 32 वर्षांनंतर त्याच्यावर तक्रार दाखल करण्यात आली आहे.

fraud
fraud

हुबळी (प. बंगाल) : आंध्र प्रदेशातील एका व्यक्तीने पश्चिम बंगालमधील अनुसूचित जाती वाल्मिकी समाजाचे बनावट प्रमाणपत्र तयार करून दक्षिण पश्चिम रेल्वेत नोकरी मिळवल्याची माहिती समोर आली आहे. हे प्रकरण तब्बल 32 वर्षांनंतर समोर आले आहे. या व्यक्तीविरुद्ध पश्चिम बंगालमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आंध्र प्रदेशात वाल्मिकी समाज मागासवर्गीय : आंध्र प्रदेशच्या प्रकाशम जिल्ह्यातील मंडल चक्रधार व्यंकटसुब्बिया याच्यावर फसवणुकीचा आरोप आहे. तसेच पडताळणी न करता जात प्रमाणपत्र देणारे तहसीलदार, महसूल निरीक्षक आणि ग्राम लेखापाल यांच्याविरुद्ध हुबळी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंध्र प्रदेशात वाल्मिकी समाज मागास वर्गात मोडतो. मंडल चक्रधर यांनी डिसेंबर 1991 मध्ये हुबळी तहसीलदारांना खोटे घोषणापत्र व दस्तऐवज सादर करून पश्चिम बंगालमधील वाल्मिकी अनुसूचित समुदायाचे प्रमाणपत्र मिळवले.

१५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल : आंध्र प्रदेशातील मंडला व्यंकटसुबय्या यांनी स्वतःच्या आणि दोन मुलांच्या नावाने अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळवून फसवणूक केली आहे. तत्कालीन तहसीलदार, महसूल निरीक्षक व ग्राम लेखापाल यांनी त्याचे पूर्वज व नातेवाइकांचे कागदपत्रे न तपासून गुन्हा केला आहे. या प्रकरणी तहसीलदार, महसूल निरीक्षक, ग्राम लेखापाल यांच्यासह १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागपूरच्या आरोपीला गोव्यातून अटक : छत्तीसगडमधील दुर्ग शहरात 7 फेब्रुवारीला 3 कोटीचा दरोडा टाकल्याची घटना घडली होती. या दरोड्याप्रकरणी दुर्ग पोलिसांनी नागपूरच्या आरोपीच्या गोव्यातून मुसक्या आवळल्या आहेत. अक्षय ईरानी असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरुन आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. अक्षयने एका वर्षात दुर्गमध्ये 8 तर दोन वर्षात नागपुरात तब्बल 40 दरोडे टाकल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. यासोबतच नागपुरात अक्षयवर 41 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्यात चोरी, फसवेगिरी, यासह लुटमार, दरोडा आणि खंडणीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. अक्षय मुंबईत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर छत्तीसगड पोलिसांनी मुंबई गाठली. मात्र अक्षयने गोव्यात पळ काढल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर छत्तीसगडचे पोलीस पथक गोव्यात जाऊन धडकले. पोलिसांच्या पाच सदस्यीय पथकाने गोव्यात अक्षयच्या मुसक्या आवळल्या.

हेही वाचा : Maulana Arshad Madani: 'अल्लाह आणि ओम एकच..', मौलाना अरशद मदनी यांच्या विधानानंतर झाले वादंग, नेमकं काय म्हटले मौलाना?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.