लखनऊ - उत्तराप्रदेशमधील मोरादाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली. आई आणि पत्नीच्या भांडणाला कंटाळून एका 37 वर्षीय व्यक्तीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. ही घटना सोमवारी रात्री घडली आहे. सचिन सैनी असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
पखवाराभागातील रहिवासी सचिनने आपल्या राहत्या इमारतीमधील पाचव्या मजल्यावरून उडी घेत आत्मह्या केली. आई आणि पत्नीच्या सतत होणाऱ्या भांडणाला तो त्रासला होता. म्हणून त्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेनंतर सचिनला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. त्याच्या पश्चात आई, पत्नी आणि एक मुलगा आहे. . मृत व्यक्तीचे पखवारा भागात क्रॉकरीचे दुकान होते.
यापूर्वीच्या घटना -
आई आणि पत्नीच्या भांडणाला कंटाळून काही दिवसांपूर्वी बिहारमधील बक्सरचे जिल्हाधिकारी मुकेश पांडे यांनी थेट आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी व्हिडिओ तयार केला होता. त्यात कुटुंबातील भांडणामुळे मला हे भ्याड पाऊल उचलावं लागतंय, असे म्हटलं होतं. तर आई- पत्नीच्या भांडणांमुळे त्रस्त झालेल्या व्यक्तीने आईची हत्या केली होती.