ETV Bharat / bharat

Crime News : संशयावरून पतीने केले पत्नीचे तुकडे; पुरावे नष्ट करण्यासाठी मातीत पुरला मृतदेह - cuts body into pieces in Bengals South 24 Parganas

बंगालमधील दक्षिण 24 परगणामध्ये धक्कादायक प्रकार घडल्याचे निदर्शनास आले. पतीने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या करून तिचे तुकडे करून मातीत पुरले.

Bengal's South 24 Parganas Crime
बंगालच्या दक्षिण 24 परगणामध्ये पतीने पत्नीचे केले तुकडे
author img

By

Published : Mar 23, 2023, 9:40 PM IST

बिष्णुपूर : दक्षिण 24 परगणामधील बिष्णुपूरमधील सारडा गार्डन परिसरात कौटुंबिक वादाच्या संशयावरून एका व्यक्तीने आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केल्याचा आरोप केला आहे. आरोपी अलीम शेख याला पोलिसांनी अटक केली आहे. मुमताज शेख (३५) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी बुधवारी आरोपीसह बिष्णुपूरच्या सारडा गार्डन परिसरातील तलावाच्या मातीतून मृतदेह जप्त केला. हा नियोजित खून असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मृताची बहीणीकडून मोठे खुलासे : मात्र, या घटनेत अलीमशिवाय अन्य कोणाचा हात आहे का, याचाही तपास पोलीस करीत आहेत. मृताची बहीण मनवारा मंडल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुमताजचा विवाह मुर्शिदाबाद येथील अलीम याच्याशी 18 ते 20 वर्षांपूर्वी झाला होता. व्यवसायाने गवंडी असलेला अलीम हा कन्स्ट्रक्शनची कामे करीत होता. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगीदेखील आहे.

अलीम हा सारडा गार्डनमध्ये कॉन्ट्रॅक्टर : काही काळानंतर अलीम हा सारडा गार्डनमध्ये कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करीत होता. लग्नानंतर सासरचे लोक बिष्णुपूरच्या चिटबागी भागात राहत होते. मुमताज ही समळी परिसरातील एका चॉकलेट कारखान्यात काम करीत होती. मुमताज मंगळवारी सकाळी पतीसोबत कामावर जाण्यासाठी बाहेर पडल्या. तेव्हापासून ती परतली नाही. अलीम नेहमीप्रमाणे रात्री सासरच्या घरी परतला. त्यानंतर बुधवारी सकाळी परिसरातील लोकांना संशय आल्याने पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली.

आरोपी पतीने दिली खुनाची कबुली : अलीमला अटक करून चौकशी सुरू केली. चौकशीत आरोपी पतीने खुनाची कबुली दिली. दुपारी पोलीस अलीमसह घटनास्थळी आले आणि जमिनीत खोदून मृतदेहाचे तुकडे जप्त केले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मुमताजच्या कुटुंबीयांपासून ते स्थानिक रहिवाशांनीही आरोपी अलीमला कठोर शिक्षा करण्याची मागणी लावून धरली आहे. आता आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

हेही वाचा : UP Serial Killer : हत्येनंतर वृद्ध महिलांवर करायचा बलात्कार; वाचा सीरियल किलरची धक्कादायक इनसाइड स्टोरी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.