ETV Bharat / bharat

भवानीपूर येथील पोट निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा दणदणीत विजय

author img

By

Published : Oct 3, 2021, 3:04 PM IST

Updated : Oct 4, 2021, 6:39 AM IST

दक्षिण कोलकातातील भवानीपूर येथील पोट निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. यात राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 58 हजार 389 मतांच्या फरकाने भाजपच्या प्रियंका तिब्रेवाल यांचा पराभव करत विजय मिळवला आहे. या जागेसाठी मतमोजणीच्या एकूण 21 फेऱ्या घेण्यात आल्या.

Mamata wins Bhawanipur bypoll
Mamata wins Bhawanipur bypoll

कोलकाता - दक्षिण कोलकातातील भवानीपूर येथील पोट निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. यात राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 58 हजार 389 मतांच्या फरकाने भाजपच्या प्रियंका तिब्रेवाल यांचा पराभव करत विजय मिळवला आहे. या जागेसाठी मतमोजणीच्या एकूण 21 फेऱ्या घेण्यात आल्या.

हेही वाचा - धक्कादायक : कानपूरमध्ये ट्रिपल मर्डर! दोरीने बांधलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह

बंगालच्या विधानसभा निवडणुकीत दक्षिण कोलकात्यातील भवानीपूर मतदारसंघातून मंत्री सोभानदेब चाटोपाध्याय निवडून आले होते. मात्र, या जागेचा त्यांनी लवकरच त्याग केला, त्यामुळे येथून ममता बॅनर्जी यांना निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला होता. मुरशीदाबाद जिल्ह्यातील समसेरगंज आणि जंगीपूर येथे प्रत्येकी एका उमेदवाराच्या मृत्यूनंतर निवडणुकीला प्रतिवाद करण्यात आला.

मतमोजणी केंद्रांवर केंद्रीय दलांच्या चोवीस कंपन्या

भबानीपूर येथे 57 टक्के मतदान झाले होते. तसेच, समसेरगंज येथे 79.92 टक्के, तर जंगीपूर येथे 77.63 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. या तिन्ही मंतदारसंघात 30 सप्टेंबरला निवडणुका झाल्या होत्या. मतमोजणी केंद्रांवर केंद्रीय दलांच्या चोवीस कंपन्या तैनात करण्यात आल्या, त्याचबरोबर संपूर्ण परिसराच्या निगराणीसाठी सीसीटीव्ही लावण्यात आले.

भवानीपूर निवडणुकीत 57.09 टक्के मतदान

भबानीपूर पोट निवडणुकीत राज्य निवडणूक आयोगानुसार 57.09 टक्के मतदान झाले होते, तर समसेरगंज येथे 79.92 टक्के आणि जंगीपूर येथे 77.63 टक्के मतदान झाले होते.

गेल्या निवडणुकीत ममता बॅनर्जी पराभूत

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राम मंतदारसंघातून निवडणूक लढवली होती. येथे त्यांच्या विरोधात भाजपचे सुवेंदू अधिकारी उभे होते. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. मात्र, तृणमूल पक्षाला राज्यात चांगले यश मिळाले होते. त्यानंतर राज्याचे कृषी मंत्री सोभनदेब चाटोपाध्याय यांनी मे महिन्यात भबानीपूर जागा सोडली, यामुळे ममता बॅनर्जीं यांना भवानीपूर येथून पोट निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला होता.

हेही वाचा - महात्मा गांधी जयंती 2021 : सोनिया गांधी, मोदी, केजरीवालांकडून गांधीजींना राज घाटावर आदरांजली अर्पण

Last Updated : Oct 4, 2021, 6:39 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.