ETV Bharat / bharat

SSC Recruitment Scam Controversy : भ्रष्टाचारात दोषी आढळल्यास शिक्षा झालीच पाहिजे : ममता बॅनर्जी - Chief Minister Mamata Banerjee

पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी ( SSC Tecruitment Scam ) उद्योगमंत्री पार्थ चॅटर्जी ( Partha Chatterjee ) यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पहिल्यांदाच राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ( Chief Minister Mamata Banerjee ) यांचे वक्तव्य समोर आले आहे. कोणी दोषी आढळल्यास त्याला शिक्षा झालीच पाहिजे, असे ममता म्हणाल्या.

Mamata
Mamata
author img

By

Published : Jul 26, 2022, 8:13 AM IST

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ( Chief Minister Mamata Banerjee ) यांनी सोमवारी सांगितले की, कोणीही चुकीच्या कामात दोषी आढळल्यास त्याला शिक्षा झालीच पाहिजे. शालेय सेवा आयोग (एसएससी) घोटाळ्यात ( SSC Tecruitment Scam ) अंमलबजावणी संचालनालयाने ( ED ) त्यांचे कॅबिनेट सहकारी पार्थ चॅटर्जी ( Partha Chatterjee ) यांना अटक केल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले. येथे राज्य सरकारच्या एका पुरस्कार सोहळ्याला संबोधित करताना बॅनर्जी यांनी त्यांच्याविरोधात सुरू केलेल्या "दुर्भावनापूर्ण मोहिमेबद्दल" विरोधकांवर टीका केली. आपण भ्रष्टाचाराचे समर्थन करत नसल्याचे त्या म्हणाल्या.

न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास - “आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. एक कालमर्यादा असावी ज्यामध्ये सत्य आणि न्यायालयाचा निर्णय बाहेर यावा. कोणी दोषी आढळल्यास त्याला शिक्षा झाली पाहिजे. पक्ष कारवाईही करेल. पण, मी माझ्याविरुद्ध चालवलेल्या द्वेषपूर्ण मोहिमेवर टीका करते. भारतीय जनता पार्टीने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये बॅनर्जी अर्पिता मुखर्जी यांच्याशी बोलताना दिसत आहेत, ज्यांच्या घरातून 22 कोटी रुपये रोख सापडले आहेत. यावर ममता बॅनर्जी म्हणाल्या की, तृणमूल काँग्रेसचा याच्याशी काहीही संबंध नाही.

मी तिला ओळखत नाही - त्या म्हणाल्या, 'त्या महिलेशी पक्षाचा कोणताही संबंध नाही आणि मी तिला ओळखत नाही. मी बर्‍याच कार्यक्रमांना जाते, माझ्यासोबत कोणी फोटो काढला तर तो माझा दोष आहे का?' भाजपची खिल्ली उडवत बॅनर्जी म्हणाल्या की, जर त्यांना वाटत असेल की, केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून आपण तृणमूल काँग्रेस फोडू शकतो, तर तो त्यांचा गैरसमज आहे. त्या म्हणाल्या, 'हा तपास म्हणजे माझा पक्ष आणि माझी बदनामी करण्याचा डाव आहे का, हे पाहावे लागेल. मी भ्रष्टाचाराचे समर्थन किंवा प्रोत्साहनही देत ​​नाही.

हेही वाचा - Maharashtra breaking News : मोहम्मद जुबेर अटक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे योगी सरकारवर ताशेरे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.