ETV Bharat / bharat

कूच बिहार हिंसा : ममता दीदींनी घेतली मृतांच्या कुटुंबीयांची भेट, दोषींना शिक्षा देण्याचे आश्वासन - ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी यांनी विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात कूच बिहारच्या सीतलकुची येथे हिंसाचारात ठार झालेल्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. ममता बॅनर्जी यांनी पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच दोषींना शिक्षा देण्यासाठी लवकरच सरकार तपास सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Mamata
ममता
author img

By

Published : Apr 14, 2021, 8:50 PM IST

कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बुधवारी कूचबिहारला पोहोचल्या. यावेळी ममता बॅनर्जी यांनी विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात कूच बिहारच्या सीतलकुची येथे हिंसाचारात ठार झालेल्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. ममता बॅनर्जी यांनी पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच दोषींना शिक्षा देण्यासाठी लवकरच सरकार तपास सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कूच बिहारमधील नेत्यांच्या प्रवेशावरील 72 तासांच्या बंदीमुळे आपण मृतांच्या कुटुंबीयांना भेटू शकलो नाही, अशी खंत बॅनर्जी यांनी व्यक्त केली. हत्येसाठी जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा शोध घेण्यात येईल आणि कायद्यानुसार त्यांना कठोर शिक्षा मिळेल याची खातरजमा केली जाईल, असे ममता म्हणाल्या.

फोनद्वारे साधला होता मृतांच्या कुटुंबीयांशी संवाद -

कूचबिहार येथे निषेध मोर्चा काढून मृतांच्या कुटुंबीयांना भेट देणार असल्याचे दीदींनी म्हटले होते. मात्र, निवडणूक आयोगाने कूचबिहार जिल्ह्यातील हद्दीत घटनेला 72 तास पूर्ण होईपर्यंत कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही नेत्याला प्रवेश करू देऊ नये, असे निर्देश दिले होते. त्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्हिडिओ कॉलवरून गोळीबारात ठार झालेल्या मृतांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला आणि त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले होते. केंद्रीय सैन्यांचा वापर करून लोकांना ठार मारण्यात येत आहे. भाजपा नागरिकांची शुद्ध फसवणूक करत आहे. नरसंहार होत आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशामुले मी आता मृतांच्या कुटुंबीयांना भेटू शकले नाही. मात्र, मी त्यांना 14 एप्रिलला भेटले. मला त्यांना भेटण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही, असे ममता म्हणाल्या होत्या. आपल्या म्हणण्यानुसार ममतांनी आज कुटुबीयांची भेट घेतली.

कूच बिहार हिंसा -

चौथ्या टप्प्यातील मतदान 10 एप्रिल रोजी पार पडले. मतादानादरम्यान जमावाने मतदान केंद्रावर हल्ला केला. यावर सीआयएसएफने गोळीबार केला. यात चार जणांचा मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले. या घटनेनंतर संबंधित मतदान केंद्रवरील मतदान प्रकिया थांबवण्यात आली. ही घटना सितालकुची विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्रमांक 12 वर घडली आहे. याघटनेचा अहवाल निवडणूक आयोगाने नेमलेल्या दोन निरीक्षकांनी सादर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले होते. कूचबिहारमध्ये जे घडले त्यास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी विनंती त्यांनी निवडणूक आयोगाला केली. नागरिक मतदान करत असताना सीआयएसएफने दोनदा गोळीबार केल्याचे तृणमूल काँग्रेसने म्हटलं आहे. यात टीएमसीच्या कार्यकर्त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा टीएमसीने केला आहे.

हेही वाचा - देशातील विद्यापीठांच्या शिखर संघटनेची बैठक; पंतप्रधान मोदींनी केले संबोधित

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.