ETV Bharat / bharat

ममता बॅनर्जी सोनिया गांधींना भेटल्या; दिल्लीत वेगवान राजकीय घडामोडी - भाजप

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी बुधवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींची दिल्लीत भेट घेतली. सोनिया गांधींचे दिल्लीतील निवासस्थान 10 जनपथवर जाऊन ममता त्यांना भेटल्या. ममता सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्या विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांच्या भेटी घेणार आहेत.

ममता बॅनर्जी सोनिया गांधींना भेटल्या; दिल्लीत वेगवान राजकीय घडामोडी

author img

By

Published : Jul 28, 2021, 5:07 PM IST

Updated : Jul 28, 2021, 5:15 PM IST

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी बुधवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींची दिल्लीत भेट घेतली. सोनिया गांधींचे दिल्लीतील निवासस्थान 10 जनपथवर जाऊन ममता त्यांना भेटल्या. ममता सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्या विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांच्या भेटी घेणार आहेत.

10 जनपथ येथे घेतली सोनियांची भेट

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी दिल्ली दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोनिया गांधींची 10 जनपथ येथे भेट घेतली. यावेळी दोघींमध्ये विविध विषयांवर चर्चा झाल्या. केंद्र सरकारविरोधातील विरोधकांच्या आघाडीवर प्रामुख्याने या बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. भाजपविरोधात विरोधकांना एकत्र आणण्याच्या दृष्टीने ममता सध्या सक्रीय असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. यातूनच त्या विरोधी पक्षातील महत्वाच्या नेत्याच्या भेटी घेत आहेत.

स्थानिक पक्षांना काँग्रेसवर विश्वास

यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ममतांनी केंद्र सरकारवर टीका केली. तसेच स्थानिक पक्षांना काँग्रेसवर विश्वास असल्याचे म्हटले आहे. सोनिया गांधींनाही विरोधकांची एकजूट हवी आहे. काँग्रेसचा स्थानिक पक्षांवर विश्वास आहे आणि स्थानिक पक्षांनाही काँग्रेसवर विश्वास आहे असेही ममता म्हणाल्या. या बैठकीदरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधीही उपस्थित होते.

2024 मध्ये इतिहास घडेल

भाजप सध्या मजबूत स्थितीत आहे, मात्र विरोधक त्यापेक्षाही मजबूत असतील. 2024 मध्ये इतिहास रचला जाईल अशी आम्हाला आशा आहे. राजकारणात गोष्टी बदलत असतात. जेव्हा राजकीय वादळ येतं आणि स्थिती हाताळणे कठिण होते तेव्हा मोठे बदल होतात. जे केंद्र सरकारला विरोध करतात, त्यांच्याकडेच काळा पैसा आहे का असा सवालही ममतांनी यावेळी विचारला.

ममता महत्वाच्या नेत्यांना भेटणार

दिल्ली दौऱ्यादरम्यान ममता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह इतर महत्वाच्या नेत्यांना भेटणार आहेत. विरोधी आघाडीचे नेतृत्व करणार का असा प्रश्न दिल्लीत पत्रकारांनी विचारल्यानंतर भारत नेतृत्व करेल, आम्ही त्याचे अनुकरण करू असे ममता म्हणाल्या.

दिल्लीत राजकारण वेगात, विरोधकांकडून राहुल यांच्या नेतृत्वाचा स्वीकार

एकीकडे ममता विरोधी पक्षातील नेत्यांची भेट घेत असताना बुधवारी विरोधी पक्षातील नेते काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या नेतृत्वात एकत्र आल्याचे चित्र बघायला मिळाले. पेगासस मुद्द्यावरून सरकारला लक्ष्य करत घेतलेल्या बैठकीसह पत्रकार परिषदेचे नेतृत्वही राहुल गांधी यांनीच केल्याचे चित्र दिसले. त्यामुळे विरोधकांकडून आता राहुल गांधींच्या नेतृत्वाचा स्वीकार होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे.

हेही वाचा - सरकारने पेगाससची खरेदी केली का? हो की नाही एवढेच उत्तर देशाला हवे - राहुल गांधी

Last Updated : Jul 28, 2021, 5:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.