ETV Bharat / bharat

'लक्षद्वीपला जाऊन स्वतःचे फोटो काढतात, हे महापुरुष मणिपूरला का जात नाहीत?' खरगेंचा मोदींना खोचक सवाल

Mallikarjun Kharge : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतेच त्यांच्या लक्षद्वीप दौऱ्याचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. यावरून काँग्रेस पक्षानं त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. पंतप्रधान सर्वत्र फिरतात, पण ते मणिपूरला का जात नाहीत? असा सवाल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी उपस्थित केला.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 6, 2024, 3:21 PM IST

Mallikarjun Kharge
Mallikarjun Kharge

नवी दिल्ली Mallikarjun Kharge : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी राहुल गांधींच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'ची माहिती दिली. ही यात्रा 6700 किलोमीटरचं अंतर कसं पार करेल हे त्यांनी सांगितलं. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा मणिपूरचा मुद्दा उपस्थित करत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. पंतप्रधान सर्वत्र फिरत आहेत पण ते मणिपूरला का जात नाहीत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

  • #WATCH | Congress president Mallikarjun Kharge says, "An unfortunate incident occurred in Manipur but PM Modi either went to the beach, had a photo session swimming, went for photos at the ongoing temple construction site or went to Kerala and Mumbai. He goes everywhere, you can… pic.twitter.com/Hzh1watE8e

    — ANI (@ANI) January 6, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पंतप्रधान मणिपूरला का जात नाहीत : "मणिपूरमध्ये दुर्दैवी घटना घडल्या. मोदीजी कधी समुद्रावर जातात किंवा पोहण्याचे फोटो सेशन करतात. ते कधी मंदिरात जाऊन फोटो काढतात. कधी केरळमध्ये जाऊन फोटो काढतात तर कधी मुंबईत जाऊन फोटो काढतात. ते सगळीकडे जातात आणि नवनवीन कपडे घालून फोटो काढतात. मात्र जिथे लोक मरत आहेत, जिथे महिलांवर बलात्कार होत आहेत तिथे हे महापुरुष का गेले नाहीत? पंतप्रधान मणिपूरला का जात नाहीत? तो देशाचा भाग नाही का?" असे जळजळीत सवाल खरगेंनी उपस्थित केले.

  • राहुल गांधी जी के नेतृत्व में हम 14 जनवरी से 'भारत जोड़ो न्याय यात्रा' शुरू कर रहे हैं।

    'भारत जोड़ो न्याय यात्रा' देश के सामाजिक, आर्थिक, राजनीतिक और बुनियादी मुद्दों को लेकर निकाली जा रही है।

    : कांग्रेस अध्यक्ष श्री @kharge pic.twitter.com/HAb20nHlBW

    — Congress (@INCIndia) January 6, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सरकारनं आम्हाला बोलू दिलं नाही : केंद्रावर निशाणा साधत खरगे म्हणाले, "आम्ही संसदेत देशाशी संबंधित मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सरकारनं आम्हाला बोलू दिलं नाही. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच 146 खासदारांना निलंबित करण्यात आलं. त्यामुळेच आम्ही 'भारत जोडो न्याय यात्रे'च्या माध्यमातून लोकांमध्ये जात आहोत. जेणेकरून आम्हाला आमचे विचार त्यांच्यासमोर मांडता येतील आणि समाजातील प्रत्येक घटकाला भेटून त्यांचं म्हणणं ऐकता येईल".

भारत जोडो न्याय यात्रेचा प्रवास : मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी 'भारत जोडो न्याय यात्रे'चा लोगो लाँच केला. ही यात्रा देशवासीयांना आर्थिक, सामाजिक आणि राजकीय न्याय मिळवून देण्याच्या दिशेनं एक मजबूत पाऊल असल्याचं ते म्हणाले. "आम्ही 14 जानेवारीपासून 'भारत जोडो न्याय यात्रा' सुरू करणार आहोत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ही यात्रा मणिपूरमधील इम्फाळ येथून सुरू होणार असून ती नागालँड, आसाम मार्गे देशातील 15 राज्यांतून मुंबई पर्यंत प्रवास करेल. 110 जिल्ह्यातून जाणारी ही यात्रा लोकसभेच्या 100 आणि विधानसभेच्या 337 जागांना कव्हर करेल. या दरम्यान सुमारे 6700 किलोमीटरचं अंतर कापलं जाईल", असं त्यांनी स्पष्ट केलं.

हे वाचलंत का :

  1. राहुल गांधींच्या 'भारत न्याय यात्रे'द्वारे काँग्रेस काय साध्य करणार?
  2. २०२४ मध्ये मोदी Vs खरगे सामना रंगणार? 'INDIA' बैठकीत ममता बॅनर्जींचा प्रस्ताव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.