रोहतास (बिहार) : बिहारमधील रोहतासमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. येथे एका पुरुष कॉन्स्टेबलने महिला कॉन्स्टेबलचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल केला. या संपूर्ण प्रकरणाबाबत पीडित महिला कॉन्स्टेबलने महिला पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला. यानंतर पोलीस विभागात खळबळ उडाली. घाईघाईने आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.
महिला कॉन्स्टेबलचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला : झाले असे की, देहरी पोलीस लाईनमध्ये प्रशिक्षणादरम्यान एका पुरुष कॉन्स्टेबलने महिला कॉन्स्टेबलचा अश्लिल व्हिडिओ बनवला. या प्रकरणी महिला कॉन्स्टेबलने देहरी महिला पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला. त्यानंतर आरोपी कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले. पीडित महिला कॉन्स्टेबलने महिला पोलीस ठाण्यात दिलेल्या अर्जात म्हटले आहे की, ती देहरी पोलीस केंद्र येथील महिलांच्या वॉशरूममध्ये अंघोळ करत होती. त्यावेळी प्रशिक्षणार्थी हवालदार सुधांशू शेखरने अश्लील व्हिडिओ बनवला.
जेव्हा मी ओरडले, तेव्हा आरोपी पळू लागला. मला पोलीस अधिकाऱ्यांकडून जाणून घ्यायचे आहे की, मी वॉशरूममध्ये अंघोळ करत असताना बनवण्यात आलेला व्हिडिओ कोणत्या गुन्ह्याअंतर्गत येतो? - पीडित महिला हवालदार
आरोपी हवालदार निलंबित : एसपींनी या प्रकरणी एसआयटी स्थापन केली आहे. आरोपी हवालदार सुधांशू हा पूर्वी बिक्रमगंजच्या SDPO चा अंगरक्षक म्हणूनही तैनात होता. या प्रकरणी पीडितेने देहरी महिला पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. यानंतर एसपी विनीत कुमार यांनी महिला पोलीस ठाण्याच्या प्रमुख लक्ष्मी पटेल यांच्या नेतृत्वाखाली ५ सदस्यीय एसआयटी स्थापन केली आहे.
पोलीस विभागात खळबळ : एसआयटीने पीडित महिला हवालदाराचा जबाब नोंदवला आहे. यानंतर आरोपी कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा :
- Mumbai Crime News: धावत्या रेल्वेत विनयभंग करत महिलेला ढकलून देण्याचा प्रयत्न, आरोपीला रेल्वे पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- Mumbai Crime News : 'त्या' लेडीज गॅंगमध्ये सासू, सून अन् मुलगीच ड्रग्ज सप्लायर! पोलिसांनी आवळल्या मुसक्या
- Nagpur Crime News : गतिमंद आरोपीवर दुसऱ्या आरोपीकडून कारागृहातच लैंगिक अत्याचार; न्यायालयाचे चौकशीचे आदेश