ETV Bharat / bharat

First educated woman Kerala : शिक्षण घेतलेल्या मलबारच्या पहिल्या मुस्लिम महिला मरियुम्मांचे वयाच्या ९९ व्या वर्षी निधन

मलियेक्कल मरिय्युम्मा यांचे वयाच्या 99 व्या वर्षी निधन झाले. मरियुम्मा (Maliyekkal Mariyumma) यांचे जीवन आणि इंग्रजी भाषेबद्दलची तिची आवड यांचा केरळमधील मुस्लिम महिलांना मुक्त करण्यात मोठा प्रभाव होता. त्या शिक्षण घेतलेल्या केरळमधील पहिल्या मुस्लिम महिला होत्या (First educated woman Kerala).

शिक्षण घेतलेल्या मलबारच्या पहिल्या मुस्लिम महिलेचे वयाच्या ९९ व्या वर्षी निधन

author img

By

Published : Aug 8, 2022, 10:03 AM IST

कन्नूर: मलबारच्या पहिल्या मुस्लिम महिला ज्यांनी 1938 साली शाळेत प्रवेश घेतला. त्यांनी इंग्रजीवर प्रभुत्व मिळवले. अशा (Maliyekkal Mariyumma) मलियेक्कल मरिय्युम्मा यांचे वयाच्या 99 व्या वर्षी निधन झाले. मरियुम्मा यांचे जीवन आणि इंग्रजी भाषेबद्दलची तिची आवड यांचा केरळमधील मुस्लिम महिलांना मुक्त करण्यात मोठा प्रभाव होता (First educated woman Kerala).

1938 मध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांद्वारे चालवल्या जाणार्‍या शाळेतील थॅलासेरी येथील सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंटमध्ये मरियुम्मा शिकत होत्या. त्यांच्या समुदायाच्या तीव्र विरोधाकडे दुर्लक्ष करून त्या शिकल्या. तेव्हा इस्लामी महिलांना शाळेत जाण्यास आणि अरबी भाषेशिवाय इतर कोणतीही भाषा शिकण्यास मनाई होती. जेव्हा त्या शाळेत गेल्या तेव्हा त्यांचा समुदायाच्या सदस्यांकडून सार्वजनिकपणे अपमान केला गेला आणि छळ केला गेला. पण तरुण मरियुम्माने तिचे शिक्षण घेण्याचा निर्धार केला होता. त्यांनी नंतर सांगितले होते की शाळेचे दिवस तिच्या आयुष्यातील सोनेरी दिवस होते.

मरियुम्माचे वडील, जे सुप्रसिद्ध इस्लामिक विद्वान होते, त्यांनी मरियुम्माला तिचे शालेय शिक्षण सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहित केले. तिने शाळेत प्रवेश घेतल्यावर इंग्रजी अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी शिकवणी शिक्षकाची व्यवस्था केली. तिला फक्त मल्याळम आणि अरबी माहीत होते.

मरियुम्माने पाचवी फोरमपर्यंत शिक्षण घेतले. जे शाळेत सध्याच्या दहावीच्या समतुल्य आहे. त्यानंतर तिने लग्न केले पण घरीच शिक्षण सुरू ठेवले. आयुष्याच्या उत्तरार्धातही त्या सामाजिक कार्यात सहभागी झाल्या होत्या.

हेही वाचा - Netajis Grand Daughter Detained : सुभाषचंद्र बोस यांची पणती राजश्री चौधरी नजरकैदेत, ज्ञानवापीमध्ये करणार होत्या जलाभिषेक

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.