जयपूर (राजस्थान) : मकर संक्रांतीचा दिवस आणि जयपूर शहरात पतंग उडवल्याचा उल्लेख नाही, असे होऊच शकत नाही. मकर संक्रांतीच्या दिवशी जयपूरची पतंगबाजी ही देशभरात प्रसिद्ध आहे.
गोविंद देव मंदिरात पतंगोत्सव : जयपूरच्या आराध्य राधा गोविंद देव मंदिरात मकर संक्रांतीच्या दिवशी पतंगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. येथे अशी प्रथा आहे की मकर संक्रांतीच्या आधी येथील राजघराण्याच्या वतीने मंदिरात सोन्याचे किंवा चांदीचे पतंग अर्पण केले जातात. मंदिराच्या गर्भगृहातही पतंगांची सजावट केली जाते. तसेच दर्शनासाठी येणारे भाविकही देवतेला पतंग चढवतात.
पतंगबाजीने जयपूरला रोजगार मिळाला : राजाराम सिंग II यांनी खास लखनौहून पतंगबाजीसाठी आणलेल्या कुटुंबांना हंडी पुरा नावाच्या ठिकाणी स्थायिक केले. हंडी पुरा हा आज जयपूरचा सर्वात मोठा पतंग बाजार आहे. येथे पतंग आणि मांजाच्या व्यवसायात हजारो लोक गुंतलेले आहेत. १९व्या शतकाच्या सुरुवातीला जेव्हा कारखाने सुरू झाले तेव्हा येथे पतंग बनवण्याचा पहिला कारखाना सुरू झाला होता.
हेही वाचा : Makar Sankranti : का खाल्ली जाते मकर संक्रातीला खिचडी, जाणून घ्या धार्मिक श्रद्धा आणि परंपरा
राष्ट्रीय एकात्मतेची ओळख : जयपूरचा हंडीपुरा शहर आणि परिसरातील मकर संक्रांतीच्या दिवशी पतंगबाजांची धूम असेत. येथे पतंग आणि पतंगाचा मांजा तयार केले जातात. हंडीपुरा आणि येथील पतंगबाजी यांनी जयपूर शहराला नेहमीच धार्मिक कलहापासून दूर ठेवले आहे. येथे पतंग व्यवसायाशी संबंधित बहुतेक लोक मुस्लिम समाजातील आहेत, तर हे पतंग खरेदी करणारे हिंदू समाजाचे आहेत. अनेक दशकांपासून मकर संक्रांती हा सण या दोन समाजांना जोडण्याचे काम करत आहे. जयपूरच्या तटबंदीच्या परिसरात, दोन्ही समुदायातील लोक गच्चीवर उभे राहतात आणि पतंगबाजी करतात. आणखी एक गोष्ट म्हणजे या पतंगबाजीने समाजातील इतर भेदभावही जयपूर शहरापासून दूर ठेवले आहेत.
सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी : यावर्षी 14 आणि 15 जानेवारीला जयपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर पतंगबाजी होणार आहे. मात्र यावेळी पतंग उडवताना मांज्या मुळे कापून, छतावरून पडून अनेक जण जखमी होतात. यासाठी जयपूरच्या एसएमएस हॉस्पिटलच्या ट्रॉमा सेंटरमध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली आहे, जेणेकरून जखमींना तातडीने उपचार मिळू शकतील.
हेही वाचा : Makar sankranti 2023 : मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याची आराधना केल्यास मिळतील हे लाभ